सोलापूर जिल्ह्यात सव्वा लाख वीजग्राहकांकडून २८ कोटींचा भरणा

सोलापूर : महिन्याभरात मंगळवार (ता.७) पर्यंत जिल्ह्यात १ लाख २६ हजार ८०० वीजग्राहकांनी २८ कोटी ३ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे.
 28 crore payment from one and a half lakh electricity consumers in Solapur district
28 crore payment from one and a half lakh electricity consumers in Solapur district

सोलापूर  : मीटर रिडींग सुरु झाल्यामुळे लॉकडाऊनच्या महिन्यांमधील अचूक वीजवापराचे व समायोजित वीजबिल जूनच्या बिलासह देण्यात आले आहे. याबाबत वीजग्राहकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होत आहे. त्यामुळे महिन्याभरात मंगळवार (ता.७) पर्यंत जिल्ह्यात १ लाख २६ हजार ८०० वीजग्राहकांनी २८ कोटी ३ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये महावितरणकडून रिडींग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीजबिल देण्यात आले. काही ग्राहकांकडे २३ मार्चनंतर मीटर रिडींग होऊ शकले नाही. त्यांना मार्चसह एप्रिल व मे महिन्याचे बिल सरासरीने देण्यात आले आहे. त्यानंतर १ जूनपासून मीटर रिडींग सुरु करण्यात आले. त्यामुळे लॉकडाऊनच्या या दोन-तीन महिन्यांमध्ये वीजग्राहकांनी प्रत्यक्षात केलेल्या वीजवापराचे अचूक मीटर रिडींग उपलब्ध झाले. त्याचे समायोजित वीजबिल जूनच्या बिलासह देण्यात आले आहे. 

मात्र, जून महिन्यात तीन ते चार महिन्यांच्या कालावधीच्या रिडींगनुसार वीजबिल दिल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक कार्यालयात मदत कक्ष, वेबिनार, मेळावे, व्हॉट्‌सॲप ग्रुप आदींद्वारे शंका निरसनाचे काम युद्धपातळीवर सुरु केले. यासोबतच वीजक्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील वीजबिलांची आकारणी नियमानुसार व योग्य असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. त्यामुळे वीजग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा वेगाने सुरु झाला आहे. 

गेल्या महिन्याभरात अकलूज विभागात १३ हजार ७५० ग्राहकांनी ३ कोटी ७० लाख, बार्शी विभागात २७ हजार ९८० ग्राहकांनी ६ कोटी ९३ लाख, पंढरपूर विभागात १९ हजार ८०० ग्राहकांनी ३ कोटी ७३ लाख, सोलापूर ग्रामीण विभागात २० हजार २०० ग्राहकांनी ४ कोटी २५ लाख आणि सोलापूर शहर विभागात ४५ हजार १०० ग्राहकांनी ९ कोटी ४२ लाख रुपयांचा वीजबिल भरणा केला.

बिलाबाबत संभ्रम नको 

घरगुती वीजग्राहकांनी जूनमध्ये एकत्रित आलेल्या तीन ते चार महिन्यांच्या वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये. वीजबिलाच्या पडताळणीसाठी गेल्या तीन ते चार महिन्यांचा संपूर्ण हिशेब https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे. एकाही पैशाचा अतिरिक्त भूर्दंड वीजग्राहकांवर जूनच्या बिलामध्ये लावण्यात आलेला नाही. ग्राहकांकडे असलेल्या मीटरचे रिडींग घेतल्यानंतर अचूक वीजवापराचे बिल तयार करण्यात आले आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com