अठ्ठावीस शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

अठ्ठावीस शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
अठ्ठावीस शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

नगर ः कृषी विभागाच्या ‘आत्मा’ मार्फत देण्यात येणाऱ्या ‘उत्कष्ट शेतकरी’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदा प्रत्येक तालुक्‍यातून दोन अशा २८ शेतकऱ्यांना पुरस्काराने पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते कृषी महोत्सवात सपत्निक सन्मानित करण्यात आले. 

विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, महापौर बाबासाहेब वाकळे, कृषी उपसंचालक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आर. के. गायकवाड, आत्माचे उपसंचालक सुरेश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन संतोष संभाजी भापकर (गुंडेगाव, नगर), रमेश भांबरे (रुईछत्तीशी, नगर), बाबा जावक (रांजणगाव मशीद, पारनरे), बाबासाहेब गुंजाळ (दैठणे गुंजाळ, पारनेर), छनराज छेत्रे (करंजी, पाथर्डी), आण्णासाहेब वांढेकर (मोहोज खु. पाथर्डी), प्रमोद मोढळे (देशमुखवाडी, कर्जत), विनोद पवार (टाकळी खांडेश्‍वरी, कर्जत), साहेबराव बोराटे (पिंपळगाव आढळा, जामखेड), आजीनाथ हजारे (जवळा, जामखेड), दत्तात्रय ओगले (पेडगाव, श्रीगोंदा), राजेंद्र घेगडे (माठ, श्रीगोंदा), सविता बापुसाहेब गाडे (भैरवनाथनगर, श्रीरामपूर), योगश शहाणे (बेलापूर, श्रीरामपूर), महादेव पावसे (खामपिंप्री, शेवगाव), संतोष गादे, (शहर टाकळी, शेवगाव), मोहन तुंवर (पाचेगाव (कारवाडी, नेवासा), रमेश काळे (वाकडी, नेवासा), चंद्रकातं अडसुरे (डिग्रेस, राहुरी), रखामाजी जाधव (पाथरे खु, राहुरी), किरण अरगडे (निमगाव जाळी, संगमनेर), रामदास धुळगुंड (मांडवे बु, संगमनेर), काशीनाथ खोले (पेंडशेत, अकोले,) संपत वाकचौरे (वाशेरे, अकोले), अशोक भाकरे (धामोरी, कोपरगाव), बाबासाहेब लांडगे (दहिगाव बोलका, कोपरगाव), शेवंताबाई चौधरी (नांदणी खुर्द, राहाता), ज्ञानेश्‍वर खर्डे (कोल्हार, राहाता) यांचा गौरव करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com