कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या २८ पर्यंत उपलब्ध

Up to 28 farmers list available in Kolhapur district
Up to 28 farmers list available in Kolhapur district

कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आसुर्ले व हेर्ले येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा प्रारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) करण्यात आला.

जिल्ह्यातील ५० हजार ६१८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात आसुर्ले आणि हेर्ले येथील आधार प्रमाणिकरणाचे कामाचा पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण  झाल्या आहेत.

आसुर्ले येथील ११६ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाईल, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाच्या कामाची पाहणी केली. तसेच आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोच पावत्यांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

देसाई म्हणाले, ‘‘या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील ५० हजार ६१८ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास ३७२ कोटी रुपयांची कर्जमाफी होऊन हे शेतकरी कर्जमुक्त होतील. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून २८ तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील.’’ 

जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात आज कर्जमुक्ती योजनेतंर्गत आसुर्ले आणि हेर्ले येथे पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामाचा पथदर्शी योजना शासनाने हाती घेतली असून जिल्ह्यातील उर्वरित पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या याद्या २८ पर्यंत उपलब्ध केल्या जातील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असे त्यांनी या वेळी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com