नांदेड विभागात २८ लाख ८७ हजार टन उसाचे गाळप

नांदेड : यंदाच्या गाळप हंगामात नांदेड विभागातील चार जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी २८ लाख ८७ हजार ३५० टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.८२ टक्के उताऱ्याने ३१ लाख २३ हजार ३७ क्विंटल साखर उत्पादन घेतले.
28 lakh 87 thousand tons of sugarcane crushed in Nanded division
28 lakh 87 thousand tons of sugarcane crushed in Nanded division

नांदेड : यंदाच्या गाळप हंगामात नांदेड विभागातील चार जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी २८ लाख ८७ हजार ३५० टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.८२ टक्के उताऱ्याने ३१ लाख २३ हजार ३७ क्विंटल साखर उत्पादन घेतले. गतवर्षीच्या दुष्काळामुळे यंदा नांदेड विभागात ऊस गाळपात ४९ लाख ७४ हजार ९८३ टनाने, तर साखर उत्पादनात ५७ लाख ४ हजार १६५ क्विंटलने घट झाली. 

गतवर्षी (२०१८-१९) च्या गाळप हंगामात नांदेड विभागात २३ साखर कारखान्यांनी ७८ लाख ६२ हजार ३३३ टन उसाचे गाळप केले होते. सरासरी ११.२३ टक्के उताऱ्यांने ८८ लाख २७ हजार २०२ क्विंटल साखर उत्पादन घेतले होते. यंदा गाळप परवाने मिळालेल्या १७ पैकी ५ सहकारी आणि ९ खासगी अशा १४ साखर कारखान्यांनी २६ नोव्हें २०१९ ते ६ एप्रिल या कालावधीत ऊस गाळप केले. 

परभणी जिल्ह्यातील ३ खासगी साखर कारखान्यांनी ६ लाख २७ हजार ७५६ टन ऊस गाळप केला. सरासरी १०.९८ टक्के उताऱ्याने ६ लाख ८९ हजार ५८७ क्विंटल साखर उत्पादन घेतले. कानडखेड (ता.पूर्णा) येथील बळिराजा शुगर्सने सर्वाधिक ४ लाख २० हजार २५६ टन गाळप करून सरासरी ११.६३ टक्के उतारा घेतला. यासह ४ लाख ८८ हजार ९२७ क्विंटल साखर उत्पादन घेतले. 

हिंगोली जिल्ह्यातील ४ साखर कारखान्यांनी एकूण ७ लाख ७३ हजार १२२ टन ऊस गाळप करून सरासरी १०.९५ टक्के उताऱ्याने ८ लाख ४६ हजार ५२० क्विंटल साखर उत्पादित केली. पूर्णा सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक २ लाख ५० हजार ९५१ टन ऊस गाळप केला. सरासरी ११.१३ टक्के उताऱ्याने २ लाख ७९ हजार २०० क्विंटल साखर उत्पादित केली. 

नांदेड जिल्ह्यातील ४ कारखान्यांनी २ लाख ८७ हजार ५०७ टन ऊस गाळप केले. सरासरी १०.२१ टक्के उताऱ्याने ९ लाख ११ हजार २१५ क्विंटल साखर उत्पादन घेतले. भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने युनिट १ ने सर्वाधिक ३ लाख २९ हजार ४६१ टन ऊस गाळप केले. सरासरी ११.११ टक्के उताऱ्याने ३ लाख ६६ हजार १७५ क्विंटल साखर उत्पादन घेतले. 

लातूर जिल्ह्यातील ३ खासगी कारखान्यांनी ६ लाख ४१ हजार २९५ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.५४ टक्के उताऱ्याने ६ लाख ७५ हजार ७१५ क्विंटल साखर उत्पादित केली. जागृती शुगर्स कारखान्याने सर्वाधिक ३ लाख ७४ हजार ६२९ टन ऊस गाळप केला. १०.७७ टक्के उताऱ्याने ४ लाख ३ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन घेतले.  नांदेड विभागातील यंदाची ऊस गाळप स्थिती 

जिल्हा ऊस गाळप(टन) साखर उत्पादन(क्विंटल) साखर उतारा 
परभणी ६२७७५६ ६८९५८७ १०.९८ 
हिंगोली ७७३१२२ ८४६५२० १०.९५
नांदेड ८४५१७६ ९११२१५ १०.७८ 
लातूर ६४१२९५ ६७५७१५ १०.५४ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com