पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी (ता. १४) मुलाखती होणार आहे.
ताज्या घडामोडी
किसान सभेकडून विमा कंपनीला २८ नोव्हेंबरची डेडलाइन
पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून पीकविम्याची नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे. येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत विमा कंपनीकडून त्रुटी दूर करून परळीतील (जि. बीड) ५००-६०० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यानंतर अखिल भारतीय किसान सभेने मंगळवारी (ता. १९) रात्री आंदोलन मागे घेण्याचे ठरविले आहे. मात्र, कंपनीने तोपर्यंत नुकसानभरपाई न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेचे जिल्हा समितीचे सदस्य अॅड. अजय बुरांडे यांनी दिला आहे.

दि ओरिएन्टल विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसून आल्यानंतर अखिल भारतीय किसान सभेने कृषी आयुक्त कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढला होता. या वेळी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी तातडीने लक्ष घालून तांत्रिक चुकांमुळे एकही शेतकरी विम्याचा वंचित राहता कामा नये, असे निर्देश विमा कंपनीला दिले.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर दहा कोटी रुपये विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले असल्याचे सांगितले. त्यामुळे दि ओरिएन्टल विमा कंपनीच्या कार्यालयासमोर सुरू केलेले मुक्काम सत्याग्रह आंदोलन किसान सभेने मागे घेऊन विमा कंपनीला अखेरची डेडलाइन दिली आहे.
किसान सभेचे जिल्हा समितीचे सदस्य अॅड. अजय बुरांडे म्हणाले की, ‘‘कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्यापूर्वी किसान सभेचे सर्व पदाधिकारी विमा कंपनीचे क्षेत्रिय प्रबंधक पी. एस. मूर्ती यांच्याशी चर्चा झालेली होती. श्री. मूर्ती यांनी आम्हाला सांगितले आहे, की कृषी आयुक्तांनी सूचना दिल्यास आम्ही नुकसानभरपाई देऊ. म्हणून आम्ही कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला आहे. कृषी आयुक्तांनी सूचना दिल्यामुळे येत्या आठ दिवसांत नुकसानभरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंगळवारअखेरपर्यंत सुमारे २२५ ते २५० शेतकऱ्यांना एक कोटी ८२ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळालेली आहे. अजूनही रोज शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये पैसे वर्ग होत आहे.’’