agriculture news in Marathi 28 project started from start in state Maharashtra | Agrowon

‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना राज्यात प्रारंभ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून आत्तापर्यंत २८ पथदर्शक प्रकल्पांच्या विस्तार कामांना सुरुवात झाली आहे. यात पहिल्या टप्प्यात ५३ कोटी रुपये अनुदान वाटले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून आत्तापर्यंत २८ पथदर्शक प्रकल्पांच्या विस्तार कामांना सुरुवात झाली आहे. यात पहिल्या टप्प्यात ५३ कोटी रुपये अनुदान वाटले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शासनाने २१०० कोटी रुपये खर्चाच्या ‘स्मार्ट’ अर्थात महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची प्रमुख अंमलबजावणी कृषी खात्याकडे दिली आहे. कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्याकडे प्रकल्पाचे संचालकपद आहे. कृषी खात्याने पुन्हा जबाबदारी ‘आत्मा’चे संचालक किसन मुळे यांच्याकडे सोपविली आहे. शेतकरी संस्थांसाठी http://www.smart-mh.org या संकेतस्थळावर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. 

६० टक्क्यांपर्यंत मिळणार अनुदान 
‘‘आत्तापर्यंत ३०० शेतकरी संस्था तसेच १४० भागीदार संस्थांनी नोंदणी केली आहे. ६० टक्क्यांपर्यंत अनुदान या प्रकल्पातून मिळणार आहे.  राज्यातील शेतकरी समूहाच्या कृषी व्यापाराला चालना देणे आणि छोट्या शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेणे हे मुख्य हेतू या प्रकल्पाचे आहे. प्रकल्पासाठी संस्थांना त्यांचे भांडवले गुंतवणे बंधनकारक आहे. त्यासाठी बॅंकांकडून प्रोत्साहन दिले जात आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी विभागाकडून राज्यभर तयार केल्या जात असलेल्या पथदर्शक प्रकल्पांचे एकूण मूल्य ८५ कोटी ७४ लाख रुपये आहे. त्यात ६५ हजार शेतकरी आणि ६४ शेतकरी संस्था सहभागी आहेत. शेतकरी स्वतःकडील २८ कोटी रुपये गुंतवणार असून स्मार्टकडून मिळणारे अनुदान ५३ कोटी रुपयांच्या पुढे असेल.

कापूस मुल्यसाखळीसाठी १०० कोटी 
राज्यातील छोट्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कापूस पिकाकरिता ‘स्मार्ट कॉटन’ राबविला जात आहे. यात शेतकरी गट आणि जिनिंग मिल्सचालकांसाठी १०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. १२ जिल्ह्यांमधील चार लाख शेतकऱ्यांसाठी कापूस पणन संघाला बरोबर घेत कृषी विभागाकडून हा निधी खर्च केला जाईल. 

२४ पिकांसाठी २५० ठिकाणी बाजारपेठ प्रकल्प
शेतकऱ्यांच्या संस्थांनी तयार केलेल्या बाजारपेठ प्रकल्पांना अनुदान मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातून असे २५० प्रकल्प निवडण्यात आले आहेत. यात सोयाबीन, कापूस, मका, तूर, हरभरा, डाळी, भरडधान्ये, भात, केळी, डाळिंब, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, काजू, पेरू, अंजीर, सीताफळ, आंबा, टोमॅटो, कांदा, भेंडी, बटाटा, भाजीपाला, हळद या पिकांचा समावेश आहे.

बड्या कंपन्यांचा सहभाग
‘स्मार्ट’मधून शहरी भागात सुरक्षित शेतमाल पुरवठा प्रकल्प राबविले जातील. त्यात महिंद्रा, टाटा केमिकल्स्, टाटा रॅलीज सारख्या बड्या कंपन्यांचा सहभाग आहे. राज्यातील ५४ शेतकरी संस्थांना सोबत घेत ८३ कोटी रुपयांचे १५ उपप्रकल्प राबविले जात आहेत. यात देखील ४७ कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान शासनाकडून वाटले जाणार आहे. वेकुल, कॅप्रीन अॅग्रो, अपना बाजार, कोमेगे, महिंद्रा, गो-फॉर-फ्रेश, हॅपीरुटस्, वारणा, लिशियस, वेलस्पन, लिनअॅग्रो, एडीएम, सीपी फिडस्, टाटा अशा कंपन्यांचा यात समावेश आहे.

प्रतिक्रिया
राज्यात ‘स्मार्ट’ प्रकल्प सुरू झाल्यानंतर सहभागासाठी शेतकरी संस्था तसेच खरेदीदार संस्थांनी दाखविलेला उत्साह लक्षणीय आहे. पहिल्याच टप्प्यात ४४० संस्थांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे गावपातळीवर ‘आत्मा’चा साधा शेतकरी गट देखील या प्रकल्पाकरिता नोंदणी करू शकतो. 
- दशरथ तांभाळे, अतिरिक्त प्रकल्प संचालक, ‘स्मार्ट’.


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...