नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी २८ पथके
राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झालेला असताना जिल्ह्यात एकही केस अद्याप समोर आलेली नाही. तरी सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्ह्याभरात २८ पथके तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झालेला असताना जिल्ह्यात एकही केस अद्याप समोर आलेली नाही. तरी सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्ह्याभरात २८ पथके तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
दरम्यान, सुरगाणा, इगतपुरी येथील मृत पक्ष्यांचे तपासणी अहवाल येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव एकीकडे असतानाच महाराष्ट्रासह देशाच्या काही राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’ने शिरकाव केला आहे. त्यामुळे यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. जिल्ह्यात सुदैवाने ‘बर्ड फ्ल्यू’ फैलाव झालेला नसला तरी जिल्हा प्रशासनाने मात्र योग्य ती तयारी केली आहे.
त्याबाबत या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात २८ पथके तयार केली आहेत. जिल्ह्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा फैलाव झाल्यास पक्ष्यांची विल्हेवाट कशी लावायची काय, कशी खबरदारी घ्यायची या संदर्भातही मार्गदर्शक सूचना संबंधित विभागाने पथकांमधील कर्मचाऱ्यांना दिल्याचे मांढरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात इगतपुरी, सुरगाण्यासह अन्य काही ठिकाणी बगळे, कबूतर, कावळे मृत अवस्थेत सापडले. त्यांचे नमुने घेत ते तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये त्याचे अहवाल हाती येण्याची शक्यता असल्याचे मांढरे म्हणाले. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नसून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्ह्यात १ हजार ५४० पोल्ट्री फार्म असून, त्यात ८५ लाख पक्षी संख्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी अधिक आल्याने पशुसंवर्धन विभाग जलसंपदा विभागाचे जलाशये, वन विभागाचे क्षेत्र यावर लक्ष केंद्रित करून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी जिल्ह्यातील २६३ पशुवैद्यकीय दवाखान्यांची यंत्रणा सक्रिय झाली आहे.
- 1 of 1065
- ››