राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्ग

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा गुरुवारी (ता. १३) सकाळी बंद झाला. या दरवाजातून २८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
2800 cusec discharge from Radhanagari
2800 cusec discharge from Radhanagari

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा गुरुवारी (ता. १३) सकाळी बंद झाला. या दरवाजातून २८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गुरुवारी (ता. १३) सकाळी ९ वाजता संपलेल्या चोवीस तासांत राधानगरीत ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हातकणंगले शिरोळ तालुक्यात तर पाऊस जवळजवळ थांबल्यासारखी स्थिती आहे.

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात राधानगरी तालुक्यात ३१.१७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ मंदावली आहे.

धरणातील पाणीसाठे वाढत असले तरी मागील चार दिवसांच्या तुलनेत वाढण्याची गती असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. धरणक्षेत्रात थांबून थांबून पावसाच्या सरी येत आहेत पण संततधार पाऊस नसल्याने धरणाचे पाणी हळूहळू वाढत आहे. पुढील दोन दिवसांत पावसाचे प्रमाण आणखी कमी झाल्यास ज्या धरणातून खबरदारी म्हणून जादा पाणी सोडण्यात येत आहे. त्याचे प्रमाण कमी करण्याचे संकेत पाटबंधारे विभागाने दिले आहेत.

पंचगंगेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट गुरुवारी कायम राहिली. गुरुवारी सकाळी पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधारा जवळ ३२ फूट आठ इंच इतकी नोंदवली गेली. गेल्या चार दिवसांत दहा फुटांपेक्षा जास्त पाणी कमी झाले आहे. यामुळे पुराचा धोका तूर्त तरी टळला आहे.

जिल्ह्यातील अन्य नद्यांचे पाणीही झपाट्याने ओसरत असून बंधारेही मोकळे होत आहेत. सकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील २५ बंधारे अद्याप ही पाण्याखाली होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com