agriculture news in marathi 282 crore to 16 talukas in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात सोळा तालुक्यांना २८२ कोटी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

नांदेड : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी, पूर व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पहिल्या टप्प्यांत २८२ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.

नांदेड : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी, पूर व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पहिल्या टप्प्यांत २८२ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.

या निधीचे मागणीच्या ५० टक्क्यांनुसार वितरण मंगळवारी (ता. १०) सर्वच सोळा तालुक्यांना करण्यात आले. हा निधी तालुकास्तरावरुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली.

जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीत सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मुगासह सोयाबीन, कापूस, ज्वारी या जिराईत पिकांसह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. यानंतर ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने पुन्हा तडाखा दिला. यात पाच लाख ६४ हजार ५१८ हेक्टरवरील जिरायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल यंत्रणेने पाठविला होता. शासनाच्या सुधारित दरानुसार जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार ५१८ हेक्टर 
बाधित क्षेत्रासाठी ५६५ कोटी १३ लाख रुपये निधी लागेल. मंगळवारी (ता.१०) नुकसान झालेल्यांना मदत देण्यासाठी शासनाने २८४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी दिला. 

तालुकानिहाय वितरित निधी

नांदेड- १० कोटी ३३ लाख, अर्धापूर - आठ कोटी ५१ लाख, कंधार - २० कोटी ७६ लाख, लोहा - २६ कोटी ३६ लाख, बिलोली - १६ कोटी २० लाख, नायगाव - १९ कोटी १९ लाख, देगलूर - २२ कोटी ४१ लाख, मुखेड - २४ कोटी ४० लाख, भोकर - १९ कोटी ५७ लाख, मुदखेड - सात कोटी २९ लाख, धर्माबाद - १० कोटी २३ लाख, उमरी - १४ कोटी ३७ लाख, हदगाव - ३२ कोटी ८१ लाख, हिमायतनगर - १५ कोटी ९९ लाख, किनवट - २४ कोटी २३ लाख, माहूर - नऊ कोटी ८३ लाख.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...