साताऱ्यातील २८९५ घरांना महापुराचा दणका

साताऱ्यातील २८९५ घरांना महापुराचा दणका
साताऱ्यातील २८९५ घरांना महापुराचा दणका

सातारा : अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या महापुराचा जिल्ह्यातील दोन हजार ८९५ घरांना महपुराचा दणका बसला आहे. ही माहिती पंचनाम्यातून समोर आले आहे. त्यात पावणेदोनशे कच्ची घरे पूर्णत: बाधित आहेत. पूर कालावधीत विस्थापित केलेल्या कुटुंबांची संख्या १२३ असून, पूर्णत: बाधित कुटुंबांची संख्या दोन हजार ४८० आहे, तर एकूण दहा हजार ७५५ नागरिकांना विस्थापित करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील तालुक्‍यात पूरसदृश स्थिती निर्माण होऊन अनेक गावांत पाणी घुसले. अनेक घरांत पाणी घुसल्याने कऱ्हाड- पाटण तालुक्‍यांत तर गावेच्या गावे स्थलांतरित करावी लागली. आठवडाभर निसर्गाचे हे रौद्ररूप सुरूच होते. त्यामुळे अनेक दिवस जुनी मातीची, कुडामेडाची आणि चांगली घरेही पाण्यात राहिली. त्यामुळे त्या घरांना धोका निर्माण झाला आहे. 

अनेक घरे डोळ्यादेखत कोसळत आहेत. अनेक जुन्या मातीच्या घरांच्या भिंती कोसळून नुकसान होत आहे, तर अनेकांची घरे कधी कोसळतील याचा नेमच राहिलेला नाही. पूरग्रस्त गावात रोज दोन- चार घरे कोसळत आहेत. त्यामुळे मातीच्या घरात राहूच शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. तीच स्थिती कुडामेडांच्याही घरांची झाली आहे. 

काही गावांत तर पत्र्यासकट छत वाहून गेले आहे. नागरिकांचे संसार नव्याने उभारण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील २१०० कोंबड्या पुरामुळे मृत झाल्या आहेत. मोठी १५ आणि लहान अशी सात जनावरे मृत झाली आहेत. 

बाधित घरांची स्थिती 

पूर्ण पडलेली कच्ची घरे कऱ्हाडमध्ये १५, महाबळेश्‍वरमध्ये सात, जावळीत पाच, तर पाटणमध्ये ९५ आहेत. पक्‍क्‍या घरांची संख्या जावळीत एक, सातारा १४, तर पाटणमध्ये ३७ आहे. अर्धवट पडलेल्या कच्या घरांची संख्या कऱ्हाडमध्ये ३५२, वाई ३३, महाबळेश्‍वर ११६, जावळी २९५, सातारा ६९, खंडाळा तीन, कोरेगाव, १५८, तर पाटणमध्ये ९३५ इतकी आहे.

अधर्वट पडलेल्या पक्‍क्‍या घरांची संख्या वाई नऊ, जावळी चार, सातारा १३३, कोरेगाव तीन, तर पाटणमध्ये १८ आहे. याशिवाय अंशतः बाधित घरांची संख्या सातारा ५६९, जावळी २२७, कऱ्हाड ४५०, पाटण ९८६, वाई ३००, महाबळेश्‍वर ७१, खंडाळा २८२, तर फलटणध्ये पाच आहे. तसेच वाई, कोरेगाव, पाटण तालुक्‍यांतील ७३ झोपड्या बाधित झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com