पीडीसीसी’च्या निवडणुकीसाठी २९ अर्ज दाखल 

राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली.
29 applications filed for PDCC elections
29 applications filed for PDCC elections

पुणे : राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी चार विद्यमान संचालकांनी, तर दुसऱ्या दिवशी २५ उमेदवार, अशा एकूण २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांच्यासह आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार संजय जगताप, संचालक अ‍ॅड. संजय काळे यांच्यासह राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अर्जांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी दिली.  उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दोन दिवसांत ६० उमेदवारांनी १८२ अर्ज नेले आहेत. आठ मतदारसंघांतून २१ संचालक निवडले जाणार आहे. या निवडणुकीसाठी विविध गटांतून एकूण मतदारांची संख्या ५ हजार १६६ एवढी आहे. पीडीसीसी बँकेच्या २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणुकीचे विविध टप्पे जाहीर करण्यात आलेले आहेत. या घोषित कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हा बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शासकीय सुट्ट्या वगळून अर्ज दाखल करता येणार आहेत.  निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी (सोमवारी) ‘अ’ गटातून (तालुका प्रतिनिधी-विकास सोसायटी) चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये रमेश थोरात (दौंड), आमदार दिलीप मोहिते पाटील (खेड), आमदार संजय जगताप (पुरंदर), संजय काळे (जुन्नर) यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या दिवशी (बुधवारी) दत्तात्रय येळे (बारामती), रांजेद्र ज्ञानोबा कांचन (हवेली), निवृत्ती गणपतराव गवारी (शिरूर), ज्ञानोबा सावळेराम दाभाडे (मावळ), स्नेहलता सुभाष कांचन (हवेली), दत्तात्रय विठोबा भरणे (इंदापूर), अकुंशराव खंडेराव काकडे (पुणे), तुरशीराम गोपाळा भोईर (जुन्नर), रेवनानाथ कृष्णाजी दारवटकर (वेल्हे), सतीश शिवाजीराव काकडे (बारामती) या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा डिसेंबर असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com