Agriculture News in Marathi 29 applications filed for PDCC elections | Agrowon

पीडीसीसी’च्या निवडणुकीसाठी २९ अर्ज दाखल 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली.

पुणे : राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी चार विद्यमान संचालकांनी, तर दुसऱ्या दिवशी २५ उमेदवार, अशा एकूण २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात यांच्यासह आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार संजय जगताप, संचालक अ‍ॅड. संजय काळे यांच्यासह राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अर्जांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी दिली. 

उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दोन दिवसांत ६० उमेदवारांनी १८२ अर्ज नेले आहेत. आठ मतदारसंघांतून २१ संचालक निवडले जाणार आहे. या निवडणुकीसाठी विविध गटांतून एकूण मतदारांची संख्या ५ हजार १६६ एवढी आहे. पीडीसीसी बँकेच्या २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणुकीचे विविध टप्पे जाहीर करण्यात आलेले आहेत. या घोषित कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हा बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शासकीय सुट्ट्या वगळून अर्ज दाखल करता येणार आहेत. 

निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी (सोमवारी) ‘अ’ गटातून (तालुका प्रतिनिधी-विकास सोसायटी) चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये रमेश थोरात (दौंड), आमदार दिलीप मोहिते पाटील (खेड), आमदार संजय जगताप (पुरंदर), संजय काळे (जुन्नर) यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या दिवशी (बुधवारी) दत्तात्रय येळे (बारामती), रांजेद्र ज्ञानोबा कांचन (हवेली), निवृत्ती गणपतराव गवारी (शिरूर), ज्ञानोबा सावळेराम दाभाडे (मावळ), स्नेहलता सुभाष कांचन (हवेली), दत्तात्रय विठोबा भरणे (इंदापूर), अकुंशराव खंडेराव काकडे (पुणे), तुरशीराम गोपाळा भोईर (जुन्नर), रेवनानाथ कृष्णाजी दारवटकर (वेल्हे), सतीश शिवाजीराव काकडे (बारामती) या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा डिसेंबर असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...