अमरावतीच्या २९ गावांत पाणीप्रश्न झाला गंभीर

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यातील २९ गावांना ३२ विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा केला जात आहे.
अमरावतीच्या २९ गावांत पाणीप्रश्न झाला गंभीर In 29 villages of Amravati The water question became serious
अमरावतीच्या २९ गावांत पाणीप्रश्न झाला गंभीर In 29 villages of Amravati The water question became serious

अमरावती : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यातील २९ गावांना ३२ विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठा केला जात आहे. दुर्गम मेळघाटातील चिखलदरा तालुक्‍यात एकझिरा व लवादा या दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्या वर्षी पावसाची संततधार होती. मान्सून संपल्यानंतर देखील अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली होती. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या जलस्त्रोतांमध्ये यंदा मुबलक साठा आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणी टंचाईची झळ कमी सोसावी लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. तरी देखील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांनी तळ गाठला आहे. परिणामी प्रशासनाने १४ पैकी सात तालुक्यांतील २९ गावाला मध्ये मार्च महिन्यापासून बत्तीस विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यावर भर दिला आहे. शहरी भागात देखील एक ते दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे.

संभाव्य पाणी टंचाई पाहता त्यावर मात करण्यासाठी उपाय योजनांवर भर देण्यात आला आहे. यामध्ये सद्यःस्थितीत पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या २९ गावांची तहान भागवण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले तसेच ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करतात पंचायत समितीच्या वतीने विहिरी व बोरवेल अधिग्रहणाची कारवाई केली जात आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद जिल्ह्यात झाली जमिनीची पाणी पातळी देखील वाढली होती. मात्र फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

दोन गावात टँकर दुर्गम मेळघाटात उन्हाळा आणि पाणीटंचाई हे समीकरण रूढ झाले आहे. चिखलदरा तालुक्यातील एकझिरा व लवादा या गावात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. पाणी टंचाईची तीव्रता पाहता या दोन्ही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

विहिरी-बोअरवेल अधिग्रहित गावे नांदगाव खंडेश्वर -  शिवरा, शेलुगुंड, पळसमंडळ, नागझरी, बोपी, पिंपरी गावंडा. चिखलदरा -  एकझिरा, लवादा. अमरावती - भानखेडा, मोगरा,  कस्तुरा.  यावली - नरसिंगपूर, इंदला, घातखेडा, बोडणा (परसोडा), देवरा. चांदूर रेल्वे - सावंगा विठोबा, नया सावंगा, निमला, अमदोरी, टेंभूर्णी. भातकूली - दाढी पेढी.  अचलपूर - बोर्डी, वाल्मीकपूर, खतिजापूर, कसमपूर, कुंभी वाघोली, कुष्ठा बु., परसापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com