agriculture news in Marathi, 290 crore for drip subsidy, Maharashtra | Agrowon

ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप करण्यासाठी केंद्राने यंदा २९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषीसंबंधित कोणत्याही योजनेच्या अनुदानासाठी एरवी सतत प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबकबाबत मात्र दिलासा मिळतो आहे. ‘ठिबकसाठी भरपूर अनुदान आणि अर्ज कमी,’ अशी स्थिती तयार झालेली आहे.  

राज्यासाठी गेल्या हंगामात ठिबकसाठी एकूण ५७० कोटी रुपये उपलब्ध होते. पावणेदोन लाख अर्ज आल्यानंतर त्यातील बहुतेक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. सध्या २० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप करण्यासाठी केंद्राने यंदा २९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषीसंबंधित कोणत्याही योजनेच्या अनुदानासाठी एरवी सतत प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबकबाबत मात्र दिलासा मिळतो आहे. ‘ठिबकसाठी भरपूर अनुदान आणि अर्ज कमी,’ अशी स्थिती तयार झालेली आहे.  

राज्यासाठी गेल्या हंगामात ठिबकसाठी एकूण ५७० कोटी रुपये उपलब्ध होते. पावणेदोन लाख अर्ज आल्यानंतर त्यातील बहुतेक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. सध्या २० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

“राज्य शासनाने यंदा तयार केलेल्या ठिबक आराखड्यात केंद्राकडे ४८० कोटी रुपयांची मागणी केली आहे. अर्थात ही मागणी केंद्राकडे पोचण्यापूर्वीच २९० कोटींचा पहिला हप्ता केंद्राने मंजूर केला आहे. त्यामुळे निधीची अजिबात टंचाई नाही,” अशी माहिती सूत्रांनी दिली. 

ठिबक अनुदानासाठी केंद्राकडून ६० टक्के; तर राज्य शासनाच्या तिजोरीतून ४० टक्के निधी दिला जातो. यंदा राज्याचा १९३ कोटींचा हिस्सा विचारात घेता शेतकऱ्यांना वाटण्यासाठी एकूण ४८३ कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नव्याने मागविल्या जाणाऱ्या सर्व पात्र अर्जांना अनुदान मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. शेतकरी आपला अर्ज भरण्यासाठी http://mahaethibak.gov.in/preinstall/frm_ben_uid_add.php या संकेतस्थळाची मदत घेत आहेत. अर्ज करण्याची सुविधा यंदा एक जूनपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २५ हजार अर्ज अपलोड झालेले आहेत. त्यात जळगाव ५०००, बुलडाणा ३०००, औरंगाबाद ३०००; तर जालना जिल्ह्यातून २००० अर्ज अपलोड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतकऱ्याने केलेला ऑनलाइन अर्ज पुढे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे पूर्वसंमतीसाठी जाणार आहेत. पूर्वसंमती मिळताच ३० दिवसांत कोणत्याही कंपनीकडून ठिबक संच बसविण्याची संधी शेतकऱ्याला मिळते. अर्थात, संच बसविल्याची पावती व अनुदान मागणीचा प्रस्ताव शेतकऱ्याला पुन्हा ३० दिवसांच्या आतच ऑनलाइन सादर करावा लागतो. तसे न केल्यास पूर्वसंमती पत्र आपोआप रद्द होते.

 

इतर अॅग्रो विशेष
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...