परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९ हजारावर शेतकरी बाकी

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत गुरुवार (ता.९) पर्यंत जिल्ह्यातील १ लाख १९ हजार १३५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८१३ कोटी ५५ लाख रुपये एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. परंतु, अद्याप २९ हजार ७५८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण राहिले आहे.
 29,000 farmers left in Aadhar certification in Parbhani district
29,000 farmers left in Aadhar certification in Parbhani district

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत गुरुवार (ता.९) पर्यंत जिल्ह्यातील १ लाख १९ हजार १३५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८१३ कोटी ५५ लाख रुपये एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. परंतु, अद्याप २९ हजार ७५८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण राहिले आहे. 

लाभार्थी शेतकऱ्यांनी पीककर्ज घेण्यासाठी संबंधित बॅंकेत कागदपत्रे जमा करणे, तसेच रक्कम हस्तांतरणासाठी जनसुविधा केंद्रावर जाऊन तत्काळ आधार प्रमाणिकरण करुन घेणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी दिली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत पात्र जिल्ह्यातील १ लाख ९९ हजार ५९७ शेतकऱ्यांची कर्जखाती पोर्टलवर अपलो़ड करण्यात आली आहेत. आजवर प्रसिध्द झालेल्या चार याद्यांमधील १ लाख ७१ हजार ४२ कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यांपैकी १ लाख ४१ हजार २८४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेतले आहे. परंतु, अद्याप २९ हजारांवर ७५८ आधार प्रमाणिकरण शिल्लक राहिले आहे. त्यात प्रामुख्याने भारतीय स्टेट बॅंकेच्या १३ हजार १९१ शेतकरी, जिल्हा बॅंकेच्या ११ हजार ८०५ आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे २ हजार ५८ कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

एकूण १ हजार ८०३ खात्यांबद्दल शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी जिल्हा स्तरीय समितीतर्फे ४१८ तक्रारींचे निवारण करण्यात आले. अद्याप ४८३ तक्रारी प्रलंबित आहेत. तालुका स्तरावर २४७ तक्रारीचे निवारण करण्यात आले.  अद्याप ६५५ तक्रारी प्रलंबित आहेत. आजवर कर्जमुक्तीअंतर्गंत एकूण १ लाख १९ हजार १३५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८१३ कोटी ५५ लाख रुपये एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली. 

कर्जमाफीची रक्कम जमा झालेली आहे, अथवा पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नावे असलेल्या शेतकऱ्यांनी सबंधित बॅंक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्याकडे पीककर्जासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन सुरवसे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com