चंद्रपुरात खरिपासाठी २९ हजार टन खते उपलब्ध

चंद्रपूर ः गेल्या हंगामात खत टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. या हंगामात तशीच स्थिती निर्माण होऊ नये याकरिता कृषी विभागाने पुढाकार घेत २९ हजार २४६ टन खत उपलब्ध करुन दिले आहे.
29,000 tons of fertilizer available for kharif in Chandrapur
29,000 tons of fertilizer available for kharif in Chandrapur

चंद्रपूर ः गेल्या हंगामात खत टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. या हंगामात तशीच स्थिती निर्माण होऊ नये याकरिता कृषी विभागाने पुढाकार घेत २९ हजार २४६ टन खत उपलब्ध करुन दिले आहे.

लॉकडाऊनमुळे शेतमालाची खरेदी मंदावली. परिणामी खरीप हंगामाचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांची पैशाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. घरी पडून असलेल्या शेतमालामध्ये सर्वाधिक कापूस आहे. अशा स्थितीतही खरीप तयारीत शेतकरी लागला आहे.

गेल्यावर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना तीव्र खतटंचाईचा सामना करावा लागला होता. काही विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करीत चढ्या दराने खताची विक्री केली. त्याचा भुर्दंड नाहक शेतकऱ्यांना सोसावा लागला. नजीकच्या काळात सेंद्रिय खतांचा वापर देखील वाढीस लागला आहे.

धान उत्पादक ब्रम्हपूरी, सिंदेवाही, नागभीड, मूल, सावली तसेच गोंडपिंपरी तालुक्‍यात मात्र शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर वाढीस लागला आहे. काही शेतकरी संयुक्‍त व मिश्र खतांचा वापर करतात. त्याची दखल घेत कृषी विभागाने एप्रिल अखेरर्पंत जिल्ह्याकरिता २९ हजार २४६ टन खताची उपलब्धता केली आहे. सध्या २ हजार ४३० टन साठा विक्रीस उपलब्ध आहे. जिल्ह्याची खताची एकूण मागणी ६५ हजार ५९६ टन असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com