agriculture news in Marathi, 292 mini-projects in Marathwada dry | Agrowon

मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. २७ मध्यम प्रकल्पांमध्येही पाण्याचा थेंब नाही, तर ३३९ लघुमध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ४८ लघू व ९ मध्यम प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. २५ लघू व ५ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जालना जिल्ह्यात ४७ लघू व ३ मध्यम प्रकल्पांत पाणीच नाही. ७  लघू आणि ४ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. बीड जिल्ह्यातील ९ मध्यम व तब्बल ८० लघुप्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे ३४ लघू व ५ मध्यम प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. २७ मध्यम प्रकल्पांमध्येही पाण्याचा थेंब नाही, तर ३३९ लघुमध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ४८ लघू व ९ मध्यम प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. २५ लघू व ५ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जालना जिल्ह्यात ४७ लघू व ३ मध्यम प्रकल्पांत पाणीच नाही. ७  लघू आणि ४ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. बीड जिल्ह्यातील ९ मध्यम व तब्बल ८० लघुप्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे ३४ लघू व ५ मध्यम प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे. 

लातूर जिल्ह्यातील ३४ लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असून एका मध्यम प्रकल्पातही पाण्याचा थेंब नाही. ७७ लघू व ३ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ८३ लघु प्रकल्पांसह ५ मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. ८६ लघु आणि ६ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठाही जोत्याखाली गेला आहे. नांदेड जिल्ह्यातील ३ मध्यम व ४८ लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. 

परभणी जिल्ह्यातील १६ लघुप्रकल्प व २ मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील १८ लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. मराठवाड्यातील तेरणा, मांजरा व रेणा नदीवरील बंधारे कोरडेठाक पडले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या भागातही दुष्काळाचे चटके बसत आहेत. 

आठ मोठ्या प्रकल्पांत नाही उपयुक्‍त पाण्याचा थेंब 
मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी आठ मोठ्या प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना, सिनाकोळेगाव या प्रकल्पांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्यम, लघु व मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नसने मराठवाड्यात यंदा पडलेल्या दुष्काळाची तिव्रता अधोरेखीत करीत आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...