अकोल्यात सोयाबीन बियाणेप्रकरणी २९५७ तक्रारी

अकोला ः जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या तब्बल २९५७ शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. अद्यापही तक्रारींचा ओघ सुरू असून, ही संख्या वाढत आहे.
2957 complaints regarding soybean seeds in Akola
2957 complaints regarding soybean seeds in Akola

अकोला ः जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या तब्बल २९५७ शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. अद्यापही तक्रारींचा ओघ सुरू असून, ही संख्या वाढत आहे.

यंदाच्या हंगामात खासगी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशातून बियाणे आणून विक्री केल्याचा संशय असून निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कृषी विभागाने बियाणे कंपन्या तसेच विक्रेत्यांकडून माहिती मागविणे सुरू केली आहे. यानंतर या प्रकरणातील तथ्ये बाहेर निघण्याची शक्यता आहे.

या हंगामात लागवड केलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. प्रामुख्याने महाबीज व खासगी कंपन्यांच्या बियाण्याबाबत तक्रारी आलेल्या आहेत. मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा या तालुक्यांमध्ये २००० पेक्षा अधिक तक्रारी झालेल्या आहेत. उर्वरित तालुक्यांमध्येही तक्रारींचे प्रमाण बरेच आहे. महाबीज बियाण्याबाबत १३०८ तर खासगी कंपन्यांच्या बियाण्याबाबत १६४९ तक्रारी झालेल्या आहेत. एकूण चार हजार २८ हेक्टरवरील सोयाबीन पिकाची उगवण झालेली नाही. प्रशासनाने आत्तापर्यंत अर्ध्याअधिक तक्रारींचे पंचनामे केले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्याने पंचनामे होऊ शकलेले नाहीत.

गेल्या हंगामात सोयाबीन काढणीदरम्यान अतिवृष्टी झाल्याने स्थानिक सोयाबीन उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यात बियाणे प्लाॅटधारकही होते. यामुळे बियाणे कंपन्यांना मूळ बियाणे पुरेसे व दर्जेदार उपलब्ध होऊ शकले नव्हते. असे असताना अनेक खासगी कंपन्यांनी मध्य प्रदेशातून सोयाबीन खरेदी करीत हंगामापूर्वी त्याची पॅकिंग केल्याची चर्चा आहे. हे सोयाबीन थेट बियाणे म्हणून विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले. या काळात गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा नेमकी काय करीत होती, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

परराज्यातील किती बियाणे विक्री झाले, बियाणे कोठून आले याची माहिती कृषी विभागाने विक्रेते, बियाणे कंपन्यांकडे मागविल्याचे वृत्त आहे. परंतु याबाबत कुणीही समाधानकारक माहिती देऊ शकलेले नाही. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

अहवालावर पुढील कारवाई अवलंबून जून महिन्यात तीन वेळा सोयाबीन नमुने काढण्याचे अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बियाणे नमुने काढणे, सोयाबीन पिकाचे नमुने वेळीच काढून प्रयोग शाळेत पाठविणे अपेक्षित होते.  प्रयोगशाळेच्या अहवालानुसार नापास झालेल्या लाॅटचे बियाणे विक्री  करण्यास बंदचे आदेश, साठा जप्त करता आला असता. शिवाय यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींची संख्या कमी झाली असती. या बाबीकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे याबाबत सविस्तर अहवाल आठ दिवसांत मागविण्यात आला आहे. निरीक्षक आता काय अहवाल देतात यावर पुढील कारवाई अवलंबून आहे.

गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना कारणे दाखवा सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेकडोंच्या संख्येत आलेल्या तक्रारी पाहता जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने जशा बियाणे कंपन्या, विक्रेत्यांना नोटीस दिल्या त्यासोबतच जिल्ह्यातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनाही तीन जुलैला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती मिळाली आहे. बियाणे दुकान तपासणी व सोयाबीन बियाण्याचे नमुने काढण्याच्या मुद्द्यावरून ही नोटीस देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com