‘शेततळे’ योजनेचे १५ लाख परस्पर वळती करण्याचा प्रकार

‘शेततळे’ योजनेचे १५ लाख परस्पर वर्ग
‘शेततळे’ योजनेचे १५ लाख परस्पर वर्ग

अकोला ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचे आलेले ३१ लाख ५० हजार रुपयांपैकी १५ लाख रुपये अमरावती जिल्ह्यासाठी वळती करण्याचा प्रकार अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, जिल्ह्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर वळती केलेला हा १५ लाखांचा निधी पुन्हा जिल्ह्याला मिळणार आहे. येत्या दोन दिवसांत जिल्ह्याचा हा निधी परत केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे अकोला जिल्ह्यासाठी शासनाने ३१.५० लाख रुपयांचे दिले होते. या अनुदानापैकी १५ लाख रुपयांचा निधी विभागीय कृषी सहसंचालकांनी अमरावती जिल्ह्याकडे वळती केला असल्याची बाब आमदार रणधीर सावरकर यांच्यापर्यंत पोचली होती. त्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करीत विभागीय सहसंचालकांशी संपर्क साधला. याबाबत विचारणा केली. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे आमदार सावरकर यांनी म्हटले आहे.  

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेसाठी अकोला जिल्ह्यातून ७९ लाख रुपये अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. कृषी आयुक्तालयाने अकोला जिल्ह्यासाठी ३१ लाख ५० हजार रुपये अनुदानाचा टप्पा वितरीत केला. मात्र, यातील १५ लाख रुपये अनुदान विभागीय कृषी सहसंचालकांनी अमरावती जिल्ह्यासाठी वळती करण्याचा आदेश अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला दिला होता. त्यानुसार हा निधी  वळती करण्याची कार्यवाही झाली. मात्र, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर हा एक प्रकारचा अन्याय होता. ही बाब सावरकर यांच्यापर्यंत पोचताच त्यांनी विभागीय कृषी संचालक सुभाष नागरे यांच्याशी संपर्क साधला.

निधी परत मिळणार अमरावतीला नेलेले अकोला जिल्ह्याचे १५ लाख रुपये दोन दिवसांत परत केले जाणार आहेत. याशिवाय ७९ लाख रुपये अनुदानापैकी ३१.५० लाख वगळता राहलेले अनुदानही कृषी आयुक्तालयाकडून लवकरच दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com