agriculture news in Marathi 30 center final for cotton procurement in state Maharashtra | Agrowon

कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५० फॅक्टरीच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने या वेळी मात्र पहिल्या टप्प्यात ३० केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५० फॅक्टरीच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने या वेळी मात्र पहिल्या टप्प्यात ३० केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या कारणामुळे घेतलेल्या या निर्णयावर पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी देखील शिक्कामोर्तब केले आहे.

राज्यात या वर्षी सुमारे ४५० लाख हेक्टरवर कापसाची लागवड आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र एक लाख लिटरने वाढले आहे. या माध्यमातून सुमारे चारशे पन्नास लाख क्विंटल कापूस उत्पादकतेचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या हंगामात कापूस पणन महासंघाकडून ९४ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. ९० केंद्रे आणि १५० फॅक्टरीच्या माध्यमातून ही खरेदी करण्यात आली. या वेळी मात्र अपुऱ्या कर्मचारी वर्गाचा हवाला देत पणन महासंघाने राज्यात केवळ ३० केंद्रे सुरू करण्याची तयारी चालवली आहे. या संदर्भाने पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कक्षात गुरुवारी (ता. २२) पणन महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. 

१३४ पैकी काही कर्मचारी येत्या काही दिवसांत सेवानिवृत्त होणार असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या आणखीन घटणार आहे. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर वाढीव केंद्र सांभाळणे जिकिरीचे ठरणार आहे. परिणामी, पणन महासंघाने प्रस्तावित केलेल्या ३० केंद्रांना मान्यता द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख व संचालक मंडळाने बाळासाहेब पाटील यांच्याकडे लावून धरली.

साठवणुकीकरिता शेड असलेल्या आणि दररोज सहाशे गाठी तयार करण्याची क्षमता असलेल्या जिनिंग फॅक्टरीची खरेदी केंद्र म्हणून या वेळी निवड केली जाणार आहे. गरज भासल्यास केंद्र संख्या ३६ पर्यंत नेता येईल. परंतु त्यापेक्षा अधिक संख्या वाढविणे शक्य नसल्याचे पणन महासंघाचे संचालक मंडळाने या वेळी पणनमंत्र्यांनी सांगितले. ही बाब मान्य करत पणन मंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात ३० केंद्रांना मान्यता दिली आहे.

या केंद्रांवर होईल खरेदी
नागपूर विभाग : पुलगाव (कारंजा+ आष्टी+तळेगाव) काटोल, सावनेर. 
वणी :  (वरोरा+चिमूर), मारेगाव. 
यवतमाळ : यवतमाळ, कळंब, आर्णी. 
अकोला : (बोरगाव मंजू+ कानशिवणी), कारंजा लाड. 
अमरावती :  अमरावती, वरुड, दर्यापूर, मोर्शी.
खामगाव : (जळगाव जामोद+ शेगाव), देऊळगाव राजा
औरंगाबाद : बालानगर,  (सिल्लोड+खामगाव फाटा) (शेवगाव+ कर्जत)
परभणी : गंगाखेड, (पाथरी+ मानवत)
परळी वै. : धारूर (केज+ माजलगाव).
नांदेड : भोकर, तामसा.
जळगाव : पारोळा, मालेगाव (धरणगाव+कासोदा)


इतर अॅग्रो विशेष
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...