अकोला जिल्ह्याला पिकनुकसानीचे वाढीव ३९ कोटी ३० लाख मंजूर

नुकसानभरपाईसाठीशेतकऱ्यांना शासनाने अकोला जिल्ह्यासाठी ३९ कोटी ३० रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
Pickup Damage down Wadiv 30 koti 30 lakh approved
Pickup Damage down Wadiv 30 koti 30 lakh approved

अकोलाः जिल्ह्यात गेल्या वर्षात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे जुलै महिन्यात १ लाख २२ हजार ४५६ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने शेतकऱ्यांसाठी ८४ कोटी ३६ लाख रुपयांची मदत दिली होती. दरम्यान, दिवाळीपूर्वी शासनाने शेतकऱ्यांना वाढीव मदत जाहीर केली होती. या मदतीसाठी शासनाने जिल्ह्यासाठी ३९ कोटी ३० रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.  जिल्हयात २१ ते २४ जुलै दरम्यान प्रचंड पाऊस झाला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ६ ते ९ आणि २० ते २८ तारखेदरम्यान मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान झाले होते. या नुकसानाची कृषी, महसूल व जिल्हा परिषद यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून अहवाल पाठवला होता. त्यानुसार शासनाकडे मदत निधीची मागणी करण्यात आली. शासनाने अतिवृष्टीबाधितांना निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु शेतकऱ्यांना वाढीव मदत जाहीर केल्यानंतरसुद्धा शासनाने वाढीव मदत मंजूर केली नव्हती. याबाबत मागणी केली जात होती. आता यासंदर्भात शासनाने आदेश जारी करून शेतकऱ्यांसाठी वाढीव मदतीचे ३९ कोटी ३० लाख मंजूर केले आहेत. 

असे झाले होते नुकसान  जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे १ लाख २१ हजार २९५.३६ हेक्टरवरील कोरडवाहू पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा फटका ८२४ गावांमधील १ लाख ७८ हजार ८३ शेतकऱ्यांना बसला होता. तर शेतकऱ्यांचे ८२ कोटी ४८ लाख ८ हजार ४४८ रुपयांचे झाले होते. 

आजवर मिळालेली मदत  यापूर्वी कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी ६ हजार ८००, बागायतीसाठी १३ हजार ५०० आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रती हेक्टर मदत मिळाली. आता वाढीव मदतीनुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार आणि फळ पिकांचे नुकसान झाले असल्यास प्रती हेक्टरी २५ हजारांची मदत मिळणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com