Agriculture news in Marathi 30 crore for VSI's Jalna center | Page 2 ||| Agrowon

‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या जालना येथील नव्या ऊस संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) बैठकीत मान्यता देण्यात आली.

पुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या जालना येथील नव्या ऊस संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) बैठकीत मान्यता देण्यात आली. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी संशोधनाचा विविधांगी आढावा घेतला. 

 व्हीएसआयच्या कार्यकारी परिषदेची बैठक सोमवारी (ता. २१) मांजरीच्या मुख्यालयात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी चर्चेत भाग घेतला. 

मराठवाडा, विदर्भासाठी स्वतंत्र ऊस संशोधन केंद्र सुरू होण्यासाठी श्री. पवार यांचा गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळेच गेल्या २२ फेब्रुवारीला या केंद्रासाठी १२८ एकर जागा राज्य शासनाने व्हीएसआयकडे वर्ग केली. तेथे आता १३ एकरांवर ऊस लागवडदेखील करण्यात आली आहे. ‘‘अत्यावश्यक संशोधनाच्या सर्व सुविधा नव्या केंद्रात उभाराव्यात,’’ असे श्री. पवार यांनी या वेळी सूचित केले.  

व्हीएसआयच्या इतर संशोधनाला चालना द्यावी. तसेच विविध उत्पादने येत्या पाच वर्षांत नियोजनात्मक वाढवावी, असेही निश्‍चित करण्यात आले. संशोधन व इतर भांडवली कामांसाठी येत्या पाच वर्षांत ७१ कोटी रुपयांची कामे व्हीएसआय करणार आहे. या कामांची बारकाईने माहिती घेत श्री. पवार यांनी प्रकल्पनिहाय भांडवली खर्चाला हिरवा कंदील दिला. माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रोहित पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ तसेच इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

साखर आयुक्त लिखित पुस्तकाचे प्रकाशन
मांजरी येथील व्हीएसआय, अर्थात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सोमवारी (ता. २१) झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड व सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘साखर उद्योगातून इथेनॉलनिर्मिती आणि त्याचे एफआरपीवरील परिणाम’ या पुस्तकाचे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. साखर आयुक्तांनी या वेळी श्री. पवार यांना इथनॉलनिर्मितीच्या अनुषंगाने काही मुद्द्यांचा आढावा घेणारे पत्र सादर केले. त्याचे वाचन श्री. पवार यांनी करीत या पुस्तिकेच्या निमित्ताने ‘अभिनंदनीय’ असा अभिप्रायदेखील दिला.


इतर बातम्या
जालन्यात ३९९५ खातेदारांचे आधार...जालना : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण १...
जळगाव जिल्ह्यात फळपीक विमा योजनेतून...जळगाव  : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
कोल्हापूर :महावितरणच्या थकबाकीमुक्तीत ...कोल्हापूर : कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
नाशिक : शेतकरी सोसायटीकडून सभासदांना १५...नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात...
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीत...सोलापूर ः कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...