Agriculture news in Marathi 30% grape pruning completed in Sangli | Page 3 ||| Agrowon

सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्ण

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३० टक्के फळछाटणी झाली असल्याचे माहिती द्राक्ष बागायतदार संघाच्या सूत्रांनी दिली आहे.

सांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस गेल्या पंधरा दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. गेल्या आठवड्यात पाऊस सुरू होता, त्यामुळे फळछाटणी लांबणीवर पडेल, अशी शक्यता होती. परंतु पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३० टक्के फळछाटणी झाली असल्याचे माहिती द्राक्ष बागायतदार संघाच्या सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात द्राक्षाचे सरासरी सव्वा लाख एकर क्षेत्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आणि कोरोना विषाणूचे संकट सुरूच आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी बागेचे काटेकोर नियोजन करून उत्पादन घेतले आहे. यंदाच्या द्राक्ष हंगामासाठी दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण नियोजन करत फळ छाटणीस सुरुवात केली आहे. जिल्ह्यात १० सप्टेंबरपासून छाटणीस प्रारंभ झाला आहे.

या वर्षी आटपाडी तालुक्यात आगाप फळ छाटणीस अगोदर सुरुवात झाली असून, त्यापाठोपाठ मिरज तालुक्याचा पूर्व भागातील शेतकऱ्यांनी फळ छाटणीस प्रारंभ केला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे द्राक्ष फळछाटणी लांबणीवर पडेल, अशी शक्यता होती. परंतु पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी फळ छाटणीचे धाडस केले.चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मिरज तालुक्यापासून फळछाटणीस प्रारंभ होईल. त्यानंतर हळूहळू सर्वत्र फळ छाटणीस गती येणार आहे.

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फळछाटणीस प्रारंभ केला आहे. आतापर्यंत सुमारे ३० टक्के फळछाटणी पूर्ण झाली आहे. वातावरण चांगले असल्याने वेलीवर गर्भधारणा चांगली झाली आहे. उर्वरित क्षेत्रातील फळछाटणीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे.
- चंद्रकांत लांडगे, अध्यक्ष, द्राक्ष बागायदार संघ, सांगली विभाग


इतर अॅग्रो विशेष
जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास...सातारा, सांगली, जळगाव आणि धुळे-नंदूबार जिल्हा...
विकास सोसायट्यांच्या निवडणुकीनंतरच ...पुणे ः राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी...
पीकविमा कंपन्यांकडून मिळणारी भरपाई...नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक...
राज्याला आदर्श ठरणारी जाधवांची अंजीर...पुरंदर तालुक्यातील गुरोळी (जि. पुणे) येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री अन...पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत...
सोयाबीनच्या दरामध्ये तेजीचा काळअकोला ः गेले काही दिवस दबावात असलेले सोयाबीनचे दर...
गट शेतीला दिलेल्या  अनुदानाचा गैरवापरपुणेः कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची...
तेलबियांच्या क्षेत्रात घटीचा कल कायमनगर ः एकेकाळी तेलबियांचे भरघोस उत्पादन घेण्याऱ्या...
शिराळ्यातील गुऱ्हाळ घरांना घरघर सांगली ः शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरे दसरा आणि...
अवकाळीचा फळपिकांना मोठा तडाखामागील आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी...
कापूस दराला पुन्हा उभारीपुणे ः मागील काही दिवसांत अफवांमुळे कापूस बाजारात...
बारामतीत आठशे रोहित्र बंद माळेगाव, जि. पुणे ः ‘कृषी पंप वीज धोरण २०२०’...
एकरकमी एफआरपीसाठी उच्च न्यायालयात याचिका नांदेड : राज्य सरकारने उसाची एफआरपी तीन...
सूक्ष्म सिंचनासाठी सरसकट ८०...पुणे ः सूक्ष्म सिंचनाखालील शेती क्षेत्र...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे...
जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात... कोल्हापूर : जागतिक बाजारात कच्या साखरेच्या...
भारत-कुवेतदरम्यान बांधला  जातोय कृषी...पुणे ः भारत-कुवेत दरम्यान कृषी निर्यात...
मोदींना लिहिणार खुले पत्रनवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः देशातील सुमारे ४०...
राज्यातील शेकडो रोपवाटिका मूल्यांकनाविनापुणे ः देशातील फलोत्पादन व भाजीपाला पिकांचा...
पाकिस्तानची कापूस आयात वाढणारपुणे : पाकिस्तानचा कापूस वापर वाढणार असून, आयातही...