agriculture news in marathi, 30 lakh farmers not fill up crop loan forms, Maharashtra | Agrowon

राज्यात ३० लाख शेतकरी पीकविमा कक्षेच्या बाहेर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

पुणे:  प्रधानमंत्री पीकविमा योजनेत किमान अजून ३० लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरलेला नाही. आतापर्यंत अंदाजे ५० लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. मात्र, उर्वरित बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज दाखल करावेत, असे कृषी विमा सूत्रांचे म्हणणे आहे. 

ऑनलाइन विमा अर्ज दाखल करण्यात बीड जिल्ह्यातील शेतकरी आघाडीवर आहेत. बीडमध्ये आतापर्यंत ९.५० लाख शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असून नांदेडमध्ये ९ लाख, जालन्यात ५.५० लाख, उस्मानाबादेत ५.२१ लाख, परभणीत ३.४५ लाख तर औरंगाबाद जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

पुणे:  प्रधानमंत्री पीकविमा योजनेत किमान अजून ३० लाख शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरलेला नाही. आतापर्यंत अंदाजे ५० लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. मात्र, उर्वरित बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज दाखल करावेत, असे कृषी विमा सूत्रांचे म्हणणे आहे. 

ऑनलाइन विमा अर्ज दाखल करण्यात बीड जिल्ह्यातील शेतकरी आघाडीवर आहेत. बीडमध्ये आतापर्यंत ९.५० लाख शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असून नांदेडमध्ये ९ लाख, जालन्यात ५.५० लाख, उस्मानाबादेत ५.२१ लाख, परभणीत ३.४५ लाख तर औरंगाबाद जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

हिंगोलीत १.६५ लाख, बुलढाणा १.६३ लाख, सोलापूर १.१९ लाख, यवतमाळ १.७० लाख, नगर १.०९ लाख, वाशिम ८८ हजार, अकोला ८१ हजार, लातूर ६७ हजार, अमरावती जिल्ह्यात २५ हजार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. 

पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागात शेतकऱ्यांकडून कमी अर्ज दाखल झालेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अवघे ६७, सिंधुदुर्ग २००, रत्नागिरी ५००, गडचिरोली १२००, नंदुरबार १४००, जळगाव २४००, रायगड २६००, धुळे ३०००, भंडारा ३७००, नाशिक ४१००, ठाणे ४३००, गोंदिया ५०००, सातारा ५१०० तर नागपूर जिल्ह्यात ६५०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन विमा अर्ज भरले आहेत.  

‘‘सेतू कार्यालयाची मदत न घेता स्वतः विमा अर्ज दाखल करण्यात काही भागांत शेतकऱ्यांचा पुढाकार आहे. अजून पाच शिल्लक असल्यामुळे किमान ३० लाख अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी असल्यातरी काम मात्र कोणत्याही जिल्ह्यात ठप्प नाही,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

शेतकऱ्यांना ३१ जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत विमा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. त्यासाठी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात (डिजिटल सेवा केंद्र) जावे लागेल. शेतकऱ्यांना कोणतीही समस्या असल्यास विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.


इतर अॅग्रो विशेष
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...