राज्यात ३० टक्के दूध वापराविना

कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर राज्यात सद्यस्थितीत ३० टक्के दुधाचा अतिरिक्त पुरवठा सुरू आहे.
milk collection
milk collection

पुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर राज्यात सद्यस्थितीत ३० टक्के दुधाचा अतिरिक्त पुरवठा सुरू आहे. या जादा दुधाचे काय करावे असा प्रश्न डेअरी उद्योगासमोर उभा आहे, अशी माहिती चितळे डेअरी उद्योग समुहाचे मुख्य संचालक श्रीपाद चितळे यांनी दिली. 

‘‘डेअरी उद्योगामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या संसाराला आधार मिळतो. त्यामुळे व्यवसाय करतानाही सामाजिक हित ठेवून डेअरी उद्योगातून निर्णय घेतले जातात. आताही चितळे डेअरीकडे २५ ते ३० टक्के जादा दूध येत आहे. मात्र, आम्ही दर उतरवलेले नाहीत. पावडर रुपांतरणाकडे अतिरिक्त दूध पुढे वळविले जात आहे. तथापि, ही स्थिती कितपत ओढत न्यायची यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे दुधाचे दर खाली आणून उद्योगाला आपली चाके चालवावी लागतील,’’ असे श्री. चितळे म्हणाले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेअरी उद्योगाचा खप घसरला आहे. उपहारगृहे, आयटी पार्क, कार्यालये बंद असल्यामुळे दुधाचा वापर कमी झाला आहे. यंदा गुडीपाडवा देखील डेअरी प्रक्रिया उत्पादकांना प्रचंड तोटा देणारा ठरला. बाजारात दूध पावडर, लोणी, तूप याचाही खप ठप्प झालेला आहे. त्यामुळे प्रक्रियेसाठी अतिरिक्त दूध कितपत वाढवायचे असा प्रश्न आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून आधार मिळणे अपेक्षित आहे, असेही श्री. चितळे यांनी स्पष्ट केले. 

राजहंसने दूध कमी करण्याच्या सूचना  संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया (राजहंस) संघाने अतिरिक्त दूध न स्विकारण्याचे ठरविले आहे. राजहंसने शेतकरी दूध उत्पादक सोसायट्यांना २५ टक्के दूध कमी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘‘संघाला दूध वितरणात अडचणी तयार झालेल्या आहेत. त्यामुळे आम्ही केवळ ७५ टक्के दुधाचे संकलन करणार आहोत. त्यामुळे दूध संकलन करताना केवळ २५ टक्के दूध कमी करावे. १०० टक्के दूध संकलित केल्यास आपले दूध स्विकारले जाणार नाही,’’ असा इशारा गाव पातळीवरील सोसायट्यांना देण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com