agriculture news in Marathi 30 percent extra milk in state Maharashtra | Agrowon

राज्यात ३० टक्के दूध वापराविना

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर राज्यात सद्यस्थितीत ३० टक्के दुधाचा अतिरिक्त पुरवठा सुरू आहे.

पुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर राज्यात सद्यस्थितीत ३० टक्के दुधाचा अतिरिक्त पुरवठा सुरू आहे. या जादा दुधाचे काय करावे असा प्रश्न डेअरी उद्योगासमोर उभा आहे, अशी माहिती चितळे डेअरी उद्योग समुहाचे मुख्य संचालक श्रीपाद चितळे यांनी दिली. 

‘‘डेअरी उद्योगामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या संसाराला आधार मिळतो. त्यामुळे व्यवसाय करतानाही सामाजिक हित ठेवून डेअरी उद्योगातून निर्णय घेतले जातात. आताही चितळे डेअरीकडे २५ ते ३० टक्के जादा दूध येत आहे. मात्र, आम्ही दर उतरवलेले नाहीत. पावडर रुपांतरणाकडे अतिरिक्त दूध पुढे वळविले जात आहे. तथापि, ही स्थिती कितपत ओढत न्यायची यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे दुधाचे दर खाली आणून उद्योगाला आपली चाके चालवावी लागतील,’’ असे श्री. चितळे म्हणाले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डेअरी उद्योगाचा खप घसरला आहे. उपहारगृहे, आयटी पार्क, कार्यालये बंद असल्यामुळे दुधाचा वापर कमी झाला आहे. यंदा गुडीपाडवा देखील डेअरी प्रक्रिया उत्पादकांना प्रचंड तोटा देणारा ठरला. बाजारात दूध पावडर, लोणी, तूप याचाही खप ठप्प झालेला आहे. त्यामुळे प्रक्रियेसाठी अतिरिक्त दूध कितपत वाढवायचे असा प्रश्न आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून आधार मिळणे अपेक्षित आहे, असेही श्री. चितळे यांनी स्पष्ट केले. 

राजहंसने दूध कमी करण्याच्या सूचना 
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया (राजहंस) संघाने अतिरिक्त दूध न स्विकारण्याचे ठरविले आहे. राजहंसने शेतकरी दूध उत्पादक सोसायट्यांना २५ टक्के दूध कमी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘‘संघाला दूध वितरणात अडचणी तयार झालेल्या आहेत. त्यामुळे आम्ही केवळ ७५ टक्के दुधाचे संकलन करणार आहोत. त्यामुळे दूध संकलन करताना केवळ २५ टक्के दूध कमी करावे. १०० टक्के दूध संकलित केल्यास आपले दूध स्विकारले जाणार नाही,’’ असा इशारा गाव पातळीवरील सोसायट्यांना देण्यात आला आहे. 


इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...