जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के वेतन कपात
आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांच्या खात्यांवर जमा करण्यात येणार आहे.
नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांच्या खात्यांवर जमा करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. २७) नगर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.
नगर जिल्हा परिषदेची शुक्रवारी अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते, महिला व बालकल्याण समिती सभापती मीरा शेटे, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, संदेश कार्ले, जालिंदर वाकचौरे, शरद नवले आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांना सभागृहातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांसह जिल्हा परिषद कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, असे एकूण ५५ हजार कर्मचारी आहेत. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३० टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.
त्याच धर्तीवर नगर जिल्हा परिषदेनेही निर्णय घेण्याची मागणी परजणे यांनी केली. त्याला संदेश कार्ले यांच्यासह सर्व सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला. कांतिलाल घोडके यांनी शाळा खोल्यांचे निर्लेखन करण्याची मागणी केली होती. त्यावर उपाध्यक्ष शेळके यांनी जिल्ह्यातील सर्व शाळाखोल्यांचे निर्लेखन करण्यास मंजुरी दिल्याचे सांगितले.
प्रतिक्रिया
आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात तीस टक्के कपात करण्याचा विषय आला. त्यास सर्व सदस्यांनी संमती दिली. खरं तर असा ठराव करण्याची वेळच यायला नके.
- संदेश कार्ले, सदस्य , जिल्हा परिषद, नगर
- 1 of 653
- ››