agriculture news in Marathi 30 percent payment deduction if ignore parents Maharashtra | Page 2 ||| Agrowon

आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के वेतन कपात 

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांच्या खात्यांवर जमा करण्यात येणार आहे.

नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांच्या खात्यांवर जमा करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. २७) नगर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. 

नगर जिल्हा परिषदेची शुक्रवारी अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते, महिला व बालकल्याण समिती सभापती मीरा शेटे, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, संदेश कार्ले, जालिंदर वाकचौरे, शरद नवले आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांना सभागृहातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. 

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांसह जिल्हा परिषद कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, असे एकूण ५५ हजार कर्मचारी आहेत. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३० टक्के रक्‍कम कपात करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.

त्याच धर्तीवर नगर जिल्हा परिषदेनेही निर्णय घेण्याची मागणी परजणे यांनी केली. त्याला संदेश कार्ले यांच्यासह सर्व सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला. कांतिलाल घोडके यांनी शाळा खोल्यांचे निर्लेखन करण्याची मागणी केली होती. त्यावर उपाध्यक्ष शेळके यांनी जिल्ह्यातील सर्व शाळाखोल्यांचे निर्लेखन करण्यास मंजुरी दिल्याचे सांगितले. 

प्रतिक्रिया
आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात तीस टक्के कपात करण्याचा विषय आला. त्यास सर्व सदस्यांनी संमती दिली. खरं तर असा ठराव करण्याची वेळच यायला नके. 
- संदेश कार्ले, सदस्य , जिल्हा परिषद, नगर 


इतर अॅग्रो विशेष
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
सिद्धरामेश्‍वर यात्रेत भाकणूक : यंदा...सोलापूर ः ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या...
‘एफपीओं’ना बळकट करण्याची गरज ः चढ्ढा पुणे ः शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत...
कर्मचाऱ्यांनी ‘क्रॉप डॉक्टर’ व्हावे :...पुणे: राज्यातील शेतकरी कष्टपूर्वक शेती करताना...
तुरीला मिळणार दराची ‘फोडणी’ पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात घटीचा अंदाज आहे....
कृषी कायद्यांवर ‘तारीख पे तारीख’ नवी दिल्ली ः शेतकरी नेते कृषी कायदे रद्द...
गोंदियात पारा ६.८ अंशांवर पुणे ः विदर्भाच्या अनेक भागांत थंडी चांगलीच वाढली...
मराठवाड्यातील रब्बीवर रोगांचे संकट लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
खानदेशात कांदेबाग केळी जोमात जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची लागवड सुमारे एक...
नागपूर जिल्हा परिषद बांधणार...नागपूर : शेतकऱ्यांच्या मालाला शहरात बाजारपेठ...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
पुनर्भरणावर भर अन् उपशावर हवे नियंत्रण मागील पावसाळ्यात महाराष्ट्राच्या बहुतांश...
उपलब्ध पाणी शेतापर्यंत पोहोचवामराठवाड्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे...
सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतील...नवी दिल्ली ः सर्वोच्च न्यायालयाने कृषी...
सर्वोच्च न्यायालय सांगेपर्यंत समितीचे...पुणे : देशातील शेतकऱ्यांना बंदिस्त बाजारपेठांच्या...
खेडा खरेदीत कापूसदरात वाढजळगाव ः कापूसदरात या आठवड्यात वाढ झाली असून,...
आता ही संकटे सोसण्याची सहनशक्ती संपली ! नाशिक ः आता हे संकटाचं सलग तिसरं वर्ष. नोटाबंदी,...
शेतीप्रश्‍न सोडविण्याची केंद्राची इच्छा...नगर ः दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र...
हापूस आंब्यावर काळे डाग सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सलग पाच ते सहा दिवस...