agriculture news in Marathi 30 percent plant of died of cashew Maharashtra | Agrowon

काजूची तीस टक्के रोपे मृत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

तालुक्‍यात काजूच्या रोपांवर बुरशीजन्य रोग पडत आहे. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण वाढत असून त्यामुळे सुरवातीला रोपांची पाने वाळतात. त्यानंतर फांद्या वाळून रोप मृत होत आहे.

चंदगड, जि. कोल्हापूर ः तालुक्‍यात काजूच्या रोपांवर बुरशीजन्य रोग पडत आहे. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण वाढत असून त्यामुळे सुरवातीला रोपांची पाने वाळतात. त्यानंतर फांद्या वाळून रोप मृत होत आहे. सुमारे तीस टक्के झाडे या रोगाला बळी पडत असल्याने कष्टाने लागवड केलेली झाडे मरताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे रहात आहेत.

कोकण आणि कर्नाटक सीमेवरील या तालुक्‍याचे हवामान काजू पिकासाठी पोषक आहे. अलीकडच्या काळात काजू प्रक्रिया उद्योगांमुळे काजूला मागणी वाढली आहे. दरही चांगला मिळत आहे. कमी कष्टात आणि श्रमात आर्थिक प्राप्ती होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काजूची लागवड केली आहे. शासनाच्या फळबाग योजनेतून वेंगुर्ला जातीची संकरित रोपे लागवड करण्यात आली आहेत. 

शासनाकडून अनुदान मिळत असले तरी त्यासाठी शेतकऱ्यांनी कष्ट घेतले आहे. परंतु या रोपांवर बुरशीजन्य रोग पडत आहे. यात ही झाडे वाळून मृत होत आहेत. सुमारे तीस टक्के एवढे मृत रोपांचे प्रमाण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली झाडे नष्ट झाली आहेत. भविष्यात या झाडांपासून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. या संदर्भात तालुका कृषी खात्याने अभ्यास करून रोग प्रतिबंधक उपाययोजना सुचवण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया
चंदगड तालुक्यात काजूवर आलेला रोग हा बुरशीजन्य आहे. यामुळे काजू रोपे खराब होत आहेत.  याबाबत आम्ही शास्त्रज्ञांशी चर्चा केली आहे. येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेटी घेऊन याबाबतचे उपाय त्यांना थेट सांगणार आहोत.
- किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी, चंदगड


इतर अॅग्रो विशेष
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...
फळगळ विषयक ‘त्या’ संदेशापासून राहा सावधनागपूर ः केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या...
प्रत्येक शाळेमध्ये उभारणार लोकसहभागातून...पुणे : वेगाने बदलत असलेल्या हवामानाची शाळेतील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस !...पुणे : राज्याच्या विविध भागांत झालेल्या...
लाळ्या खुरकूत लसींची प्रतीक्षाच;...पुणे ः पावसाळा संपत आला तरी अद्याप राज्यातील दोन...
मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबणारपुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून)...
राज्यात पावसाच्या उघडिपीची शक्यतापुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...