agriculture news in Marathi 30 percent pomegranate production decrease Maharashtra | Agrowon

डाळिंब उत्पादनात ३० टक्के घट

अभिजित डाके
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले. अनेक भागात नुकसानभरपाई मिळाली, परंतु अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. त्यामुळे या सरकारने भरपाई द्यावी.
— शहाजी जाचक, माजी अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ

सांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर अतिवृष्टीचा फटका डाळिंब बागांना बसल्याने फुलगळ, फळकूज, यामुळे राज्यातील डाळिंबाच्या उत्पादनात ३० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. मात्र, उत्पादन घटूनही गुणवत्तेअभावी यंदा गतवर्षीच्या तुलनेत प्रतिकिलोस ३० ते ३५ रुपयांनी कमी दर मिळाला. यामुळे डाळिंब उत्पादकांना दुहेरी आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

कोरडवाहू शेतीचा आधार म्हणून डाळिंबाचे पीक घेतले जाते. राज्यात डाळिंबाचे सुमारे एक लाख ३० हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. डाळिंबामध्ये प्रामुख्याने मृग, हस्त आणि अंबिया असे तीन बहार धरले जातात.

राज्यात मृग बहार साधारणपणे २५ ते ३० टक्के धरला जातो. तर सर्वाधिक बहार हस्त घेतला जातो. मृग हंगामातील छाटणी एप्रिलमध्ये घेतली जाते. जून महिन्यात फुलोरावस्थेत पीक येते. त्यानंतर अवघ्या दोन ते अडीच महिन्यात हस्त बहार धरला जातो.

गेल्या दोन वर्षात दुष्काळामुळे डाळिंबांच्या बागा वाळून गेल्या. त्यात उपलब्ध पाण्यावर डाळिंबाच्या बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली होती. गेल्या वर्षी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणी देऊन मृग बहार धरला होता. मात्र यंदा परतीचा पाऊस आणि मॉन्सूनोत्तर पावसामुळे मृग हंगामातील काढणी आलेल्या डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे ही डाळिंब शेतकऱ्यांना वेळेत काढता आली नाहीत. 

दरम्यान, हस्त बहरातील डाळिंबाची स्थिती फुलोरावस्थेत असतानाच पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या हंगामातील फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली. तयार झालेल्या फळात पाणी शिरल्याने फळकूज झाली. तसेच बागेत पाणी साचल्याने मूळकूजही झाली. त्याचा परिणाम डाळिंब उत्पादनावर झाला असून डाळिंबाची गुणवत्ताही मिळाली नाही.

वास्तविक पाहता डाळिंबाची एकरी उत्पादकांना १० ते १२ टन धरली, तर या नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन सुमारे तीन ते चार टनाने कमी झाली. गेल्या वर्षीपेक्षा चालु हंगामात डाळिंबाला प्रति किलोस १ ते २० रुपयांनी जरी दर वाढले असले तरी डाळिंबाला घातलेला खर्चही मिळणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

दरात किंचित वाढ
डाळिंब हंगामातील मृग आणि हस्त बहारातील डाळिंबाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. डाळिंबाची गुणवत्ता घसरल्याने डाळिंबाच्या दरात वाढ झाली नव्हती. मात्र, हस्त बहारातील डाळिंबाचा दर्जा थोडा चांगला असल्याने प्रतिकिलोस १५ ते २० रुपये दर वाढला आहे. मात्र, ही वाढ पुरेशी नाही.

निर्यातही घटली
डाळिंबाची प्रामुख्याने युरोपात निर्यात होते. मात्र, अतिपावसामुळे डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कीडनाशकांचा वापर करावा लागला. त्यामुळे रिसिड्यू फ्री डाळिंब तयार करता आले नाहीत. त्याचा परिणाम थेट निर्यातीवर झाला असून, सुमारे २० ते २५ टक्क्यांनी निर्यात घटली असल्याचे डाळिंब उत्पादक संघाच्या सूत्रांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...