कृषी योजनांमध्ये ३० टक्के  महिला लाभार्थ्यांना प्राधान्य : भुसे

नाशिक : ‘‘कडक निर्बंधांच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या योजनांमध्ये ३० टक्के प्राधान्य माहिला लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे,’’ अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
30% priority for women beneficiaries in agricultural schemes: Bhuse
30% priority for women beneficiaries in agricultural schemes: Bhuse

नाशिक : ‘‘कडक निर्बंधांच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या योजनांमध्ये ३० टक्के प्राधान्य माहिला लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे,’’ अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.३) खरीप हंगाम आढावा बैठकीत भुसे दूरदृश्यप्रणालीद्वारे मालेगाव येथून बोलत होते. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे, दिलीप बनकर, दिलीप बोरसे, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ आदी उपस्थित होते. 

भुसे म्हणाले, ‘‘कृषी योजनांमध्ये महिलांनी सहभाग घेतल्यास अधिक फायदा होतो. त्यानुसार महिलांना कृषीविषयक आधुनिक प्रशिक्षण देऊन योजनांमध्ये ३० टक्के महिलांना प्राधान्य देण्यासोबतच अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना देखील कृषी योजनांचा योग्य लाभ मिळण्यासाठी त्यांच्या आवश्यक माहितीचे संकलन करण्यात आले आहे. कडक निर्बंधांच्या काळात कृषिपूरक व्यवसायांच्या दुकानांना मुभा देण्यात यावी.’’ 

भुजबळ म्हणाले, ‘‘जनतेला अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.’’ 

झिरवाळ म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या आदिवासी भागातील शेतकरी आंबा, मशरूम, स्ट्रॉबेरी अशा विविध फळांची शेती करीत आहेत. या अनुषंगाने कृषी विभागाने उत्पादन वाढीच्या दृष्टीने मार्गदर्शन करावे.’’ 

कृषिमंत्र्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे : 

  •  खरीप हंगामात महत्त्वाच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यावर भर; यासाठी ‘एक गाव एक वाण’ ही संकल्पना 
  • नियमित पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने कर्जवाटपाचे नियोजन 
  • १० टक्के नावीन्यपूर्ण पिकांच्या उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाचे नियोजनपूर्वक प्रयत्न 
  •  कापूस बियाण्यांची दरवाढ कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू 
  • रासायनिक खतांची १० टक्के बचतीसह जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी प्रयत्न   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com