सिन्नर तालुक्यात ३० टँकर सुरू

सिन्नर तालुक्यात ३० टँकर सुरू
सिन्नर तालुक्यात ३० टँकर सुरू

सिन्नर, जि. नाशिक : यावर्षी तालुक्यात अल्प पर्जन्यमानामुळे ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. तालुक्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई आहे. पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. टॅँकरची मागणी वाढू लागली आहे. परिणामी टंचाईत दीड महिन्याच्या कालावधीत दोन गावे, १०० वाड्या-वस्त्यांची भर पडली. त्यामुळे टॅँकरच्या फेऱ्यांमध्ये तिपटीने वाढ करण्यात आली आहे. सध्या तालुक्यात १३ गावे व १५३ वाड्या-वस्त्यांना दररोज ३० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यासाठी ३ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे शासनाने सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर केला. तरीही दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. तालुक्याच्या पूर्वभागात सर्वाधिक गावांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. सर्वच जलस्रोत कोरडे पडल्याने विहिरींमध्ये थेंबभरही पाणी राहिले नाही. पाण्याचा शोध सुरू असून त्यासाठी ठिकठिकाणी कूपनलिका, विहिरी खोदण्याचे काम केले. मात्र पाणी मिळत नसल्याने बळिराजा हताश झाला आहे. 

‘विहिरीत नाही तर पोहोऱ्यात कोठून येणार’ अशी अनुभूती तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. पंचायत समिती प्रशासाने योग्य नियोजन केल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत टँकर पोचू शकले. या टँकरच्या मागणीतही रोज भर पडते आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com