जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः डब्ल्यूएचओ

जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच आहे. जगात आतापर्यंत ६ लाख ३४ हजार ८३५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
CORONA
CORONA

जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच आहे. जगात आतापर्यंत ६ लाख ३४ हजार ८३५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर २९ हजार ९५७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिली. 

जगभरातील कोरोना विषाणूच्या स्थितीविषयीची माहिती ‘डब्ल्यूएचओ’ने रविवारी (ता.३०) माहिती दिली. ‘‘जगभरात रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ६३ हजार १५९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, या काळात ३ हजार ४६४ लोकांचा मृत्यू झाला. तसेच जगभरात ६ लाख ३४ हजार ८३५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून २९ हजार ९५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाबाधीतांपैकी तीन लाख ६१ हजार रुग्ण हे एकट्या युरोपातील आहेत. तर, इटलीतील ९२ हजार आणि स्पेनमधील ७२ हजार रुग्णांचा समावेश आहे. जर्मनीत ५२ हजार कोरोनाबाधीत रुग्ण आहेत,’’ असे ‘डब्ल्यूएचओ’ने सांगितले. 

इटलीत १० हजार ७७९ मृत्यू इटलीत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १० हजार ७७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशात एक लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात कोरोनाचे थैमान वाढतच असल्यामुळे सरकराने येथील लॉकडाऊन कालावधी वाढविला आहे. 

स्पेनमध्ये ६ हजार ५२८ जणांचा मृत्यू स्पेनमध्ये रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ८३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ६ हजार ५२८ जणांचा मृत्यू झाला आहे, असे स्पेनमधील सरकारने जाहिर केले. स्पेनमध्ये ७८ हजार ७९७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com