agriculture news in Marathi 30 thousand deaths due to corona Maharashtra | Agrowon

जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः डब्ल्यूएचओ

वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच आहे. जगात आतापर्यंत ६ लाख ३४ हजार ८३५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच आहे. जगात आतापर्यंत ६ लाख ३४ हजार ८३५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर २९ हजार ९५७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिली. 

जगभरातील कोरोना विषाणूच्या स्थितीविषयीची माहिती ‘डब्ल्यूएचओ’ने रविवारी (ता.३०) माहिती दिली. ‘‘जगभरात रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ६३ हजार १५९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, या काळात ३ हजार ४६४ लोकांचा मृत्यू झाला. तसेच जगभरात ६ लाख ३४ हजार ८३५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून २९ हजार ९५७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोनाबाधीतांपैकी तीन लाख ६१ हजार रुग्ण हे एकट्या युरोपातील आहेत. तर, इटलीतील ९२ हजार आणि स्पेनमधील ७२ हजार रुग्णांचा समावेश आहे. जर्मनीत ५२ हजार कोरोनाबाधीत रुग्ण आहेत,’’ असे ‘डब्ल्यूएचओ’ने सांगितले. 

इटलीत १० हजार ७७९ मृत्यू
इटलीत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १० हजार ७७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशात एक लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात कोरोनाचे थैमान वाढतच असल्यामुळे सरकराने येथील लॉकडाऊन कालावधी वाढविला आहे. 

स्पेनमध्ये ६ हजार ५२८ जणांचा मृत्यू
स्पेनमध्ये रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ८३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ६ हजार ५२८ जणांचा मृत्यू झाला आहे, असे स्पेनमधील सरकारने जाहिर केले. स्पेनमध्ये ७८ हजार ७९७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  


इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...