जालना जिल्ह्यात कापूस विक्रीसाठी ३० हजार शेतकऱ्यांची नोंदणी 

कापसाच्या हमी दराने कापूस खरेदीसाठी जालना जिल्ह्यातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या विविध केंद्रांवर आपली नोंदणी केली आहे.
cotton
cotton

जालना: कापसाच्या हमी दराने कापूस खरेदीसाठी जालना जिल्ह्यातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या विविध केंद्रांवर आपली नोंदणी केली आहे. ३० एप्रिपर्यंत ही नोंदणीची प्रक्रिया चालणार आहे. शेतकऱ्यांची नोंदणी प्रशासनाची तयारी असली तरी सीसीआयच्या केंद्रांना मात्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व कापूस पणन महासंघाच्या हमी दराने कापूस खरेदीला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस उपलब्ध असून त्याची हमी दराने खरेदी करण्यासाठी सीसीआयची खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून पुढे आली होती. या मागणीला अनुसरून कापसाची खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासन, जिनर्स, सीसीआय, बाजार समिती आदींच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.  या बैठकीत हमी दराने खरेदी साठी कापूस उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी जवळपास ८ बाजार समित्यांमध्ये सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. या सोयीनुसार दिलेल्या क्रमांकावर जवळपास ३० हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. येत्या ३० एप्रिल पर्यंत ही नोंदणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांकडे जवळपास ८ लाख ४० हजार क्विंटल कापूस उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील शहागड व मंठा येथे खाजगी जिनर्स ने कापूस खरेदी सुरू केली आहे.  परंतु सीसीआय च्या खरेदी केंद्रावरून अजून कापूस खरेदीला सुरुवात झाली नाही. या केंद्रांशी संबंधित जिनर्सनी येत्या २७ तारखेपासून आपल्या जिनिंग सुरू करण्याची तयारी दाखविल्याचे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले. तयारी नुसार सोमवारपासून किमान चार ठिकाणी कापूस खरेदी ला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची अपेक्षा प्रशासनाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com