पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार कांदा गोण्यांची आवक 

एक एप्रिलपासून गोणी पद्धतीने लिलाव सुरू झाला. आता आवक वाढली असली तर कोरोनाचा प्रादुर्भाव न होता लिलाव सुरू राहतील असे प्रयत्न आहे. बाजार समिती सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या सूचनेनुसार सोशल डिस्टन्सिंग, गर्दी नियंत्रण करून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कामकाज यशस्वीपणे करीत आहे. त्यामुळे उच्चांकी गोण्यांची पहिल्यांदा आवक झाली. -संजय पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत.
onion
onion

नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई असल्याने बाजार समित्यांनी कांदा लिलाव प्रक्रियेत बदल करून खुल्या विक्री पद्धतीऐवजी गोणी पद्धतीने लिलाव सुरू केले आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ एप्रिलपासून कामकाज सुरू होऊन शुक्रवारी (ता.३) उच्चांकी ३० हजार गोण्यांची आवक झाली आहे. गर्दी नियंत्रण करून लिलाव प्रक्रिया सुरळीत ठेवण्यात बाजार समिती प्रशासन यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संचारबंदी लागू आहे. त्यामुळे मजुरटंचाई जाणवू लागल्याने प्रथमच खुल्या पद्धतीऐवजी गोणी पद्धतीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी १२ हजार २४० गोणी आवक झाली होती. शुक्रवारी (ता. ३) लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये, कमाल १,१५१ रुपये तर सर्वसाधारण १,००१ रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान ९०० रुपये, कमाल १,७१७ रुपये तर सर्वसाधारण १,४५१ रुपये दर मिळाला. 

जिल्ह्यातील लासलगाव, नांदगाव, नामपूर, सटाणा, चांदवड व सिन्नर येथे लिलाव बंद होते. तर उमराणे बाजार समिती गावात असल्याने तसेच परिसरात रस्ते बंद केल्याने आवक कमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.  जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा आवक 

पिंपळगाव बसवंत ३०,००० गोणी 
येवला २१,२८० गोणी 
कळवण ९०० गोणी 
देवळा ३००० क्विंटल 
उमराणे २५० क्विंटल 
मनमाड १०,००० गोणी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com