agriculture news in marathi 300 to 2300 per quintal of onion in the state | Page 3 ||| Agrowon

राज्यात कांदा क्विंटलला ३०० ते २३०० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 जुलै 2021

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २९) कांद्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. या वेळी दहा किलोला १५० ते २०० रुपये दर होता.

पुण्यात प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २९) कांद्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. या वेळी दहा किलोला १५० ते २०० रुपये दर होता. सध्याची आवक आणि मागणी संतुलित आहे. त्यामुळे दर स्थिर असल्याचे कांद्याचे आडतदार राजेंद्र कोरपे यांनी सांगितले. 

सोलापुरात प्रतिक्विंटलला २०० ते २३०० रुपये दर

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक तशी जेमतेम राहिली. पण मागणी असल्याने दरात तेजी राहिली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २३०० रुपये दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक जेमतेम रोज ३० ते ४० गाड्यापर्यंत राहिली. पण मागणीच्या प्रमाणात आवक नसल्याने दर मात्र काहीसे वधारले. कांद्याची सर्व आवक स्थानिक भागातून झाली.  या आधीच्या सप्ताहातही कांद्याची आवक कमीच प्रतिदिन २० ते ३५ गाड्या अशी राहिली. तर कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १२०० रुपये, तर सर्वाधिक २००० रुपये दर मिळाला. 

गेल्या पंधरवड्यापासून कांद्याची मागणी आणि दरात सातत्याने चढ-उतार होतो आहे. या सप्ताहातही पुन्हा त्यात किरकोळ चढ-उतार वगळता दर पुन्हा तेजीत राहिले. आवकेची परिस्थिती अशीच कायम राहिली. तर कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी संजय जावळे यांनी व्यक्त केली.

जळगावात प्रतिक्विंटलला १२०० ते १८०० रुपये 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २९) ५०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते १८०० व सरासरी १५०० रुपये मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, यावल, भुसावळ आदी भागातून होत आहे. दर महिनाभरापासून स्थिर आहेत. आवक लाल कांद्याची अधिक होत आहे. पांढऱ्या कांद्याची आवक अत्यल्प आहे. 

नगरमध्ये क्विंटलला ३०० ते २१०० रुपये

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात कांद्याची लिलावाच्या दिवशी ५० ते ६० हजार गोण्याची आवक होत आहे. येथे कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते २१०० रुपयांचा दर मिळाला. गेल्या  अनेक दिवसापासून हे दर स्थिर आहेत. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवार, गुरुवार, व शनिवार असे तीन दिवस लिलाव होत असतात. सोमवारी (ता. २६) ५७ हजार ८६७ कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला १६०० ते २१०० रुपये, नंबर २ च्या कांद्याला ११०० ते १६००, तीन नंबरच्या कांद्याला ५५० ते ११०० व चार नंबरच्या कांद्याला ३०० ते ५५० रुपयांचा दर मिळाला. सरासरी १६०० रुपयांचा दर मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून नगरला कांद्याचे दर ३०० ते २००० हजार रुपयांवर स्थिर आहेत. शनिवारी  (ता. २४) ५० हजार कांदा गोण्याची आवक होऊन ३०० ते २००० हजार रुपये व सरासरी १५५० रुपयाचा दर मिळाला. २२ जुलै रोजी ४६ हजार कांदा गोण्याची आवक झाली. तर ३०० ते १९०० व सरासरी १५०० रुपयाचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

औरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते २००० रुपये दर

औरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २९) कांद्याची ३ हजार २४० क्विंटल आवक झाली. त्यास ३०० ते २००० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. तर कांद्याचे सरासरी दर ११५० रुपये प्रतिक्‍विंटल राहील, याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २२ जुलैला कांद्याची २६८९ क्‍विंटल आवक झाली. त्यास सरासरी १०५० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. २४ जुलैला ८६८ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे सरासरी दर ९७५ रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २५ जुलैला कांद्याची आवक २७९३ क्विंटल, तर सरासरी दर १०५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २६ जुलैला ८२९ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी १ हजार ११३ रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला.

२७ जुलैला कांद्याची आवक ५३२ क्विंटल, तर सरासरी दर १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. २८ जुलै रोजी ७८० क्विंटल आवक झालेल्या कांद्याला सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नांदेडमध्ये क्विंटलला७०० ते १८०० रुपये

नांदेड : नांदेड शहराजवळील बोंडार मार्केटमध्ये सध्या कांद्याची आवक दररोज ५० टन होत आहे. या कांद्याला ७०० ते १८०० रुपये दर मिळत असल्याची माहिती ठोक व्यापाऱ्याने दिली.

बोंडार मार्केटमध्ये आठवड्यातून रविवारी व गुरुवारी कांदा, लसून, आले व बटाट्याची आवक होते. या बाजारात राज्यातील अकोला, नगर, सोलापूर जिल्ह्यासह स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा येतो. गुरुवारी (ता. २९) बाजारात ५५ टन कांद्याची आवक झाली. यात कांद्यास प्रतिक्विंटल ७०० ते १८०० रुपये दर मिळत असल्याचे ठोक व्यापारी मोहमद युनूस यांनी सांगितले.

निवडक कांद्याला दर अधिकचा मिळत आहे. किरकोळ बाजारात मात्र कांदा भाव खात आहे. आठवडे बाजारात ३० ते ४० रुपये किलो दराने कांदा विकत आहेत.

अकोल्यात क्विंटलला १००० ते १६०० रुपये 

अकोला ः गेल्या काही महिन्यांपासून भाजी बाजार सुरळीत झालेले नसल्याने माल विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. बाजारात सध्या कांद्याचा तितकासा उठाव नाही. त्यामुळे कांद्याचा दर अकोल्यात एक हजार ते १६०० रुपयांदरम्यान मिळत आहेत.

दुय्यम दर्जाचा कांदा एक हजारांपासून विकत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. येथील बाजारात सध्या स्थानिक भागातीलच कांद्याची आवक होत आहे. दररोज १५ ते २० टनांपर्यंत आवक आहे. पावसामुळे कांद्याची प्रत घसरलेली आहे. त्यामुळे दुय्यम प्रतीचा कांदा १००० रुपयांपासून प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. प्रामुख्याने या दर्जाच्या कांद्याची अधिक आवक होत आहे. उच्च दर्जाचा कांदा १३०० ते १६०० रुपयांदरम्यान विकला जात आहे. तर कांद्याची किरकोळ विक्री २० ते २५ रुपये प्रतिकिलोने होत आहे.

परभणीत प्रतिक्विंटलला १००० ते १८०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान १००० ते कमाल १८०० रुपये, तर सरासरी १४०० रुपये होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी कांद्याची आवक सुरु आहे. गेल्या महिनाभरात मार्केमधील कांद्याच्या दरात फारशी सुधारणा नाही. शनिवारी (ता.२४) कांद्याची २०० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल १००० ते १७०० रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता.२७) कांद्याची १०० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२९) कांद्याची किरकोळ विक्री २० ते ३० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी सुरेश गव्हाणे यांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात मोसंबी ८०० ते ४६०० रुपये...औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते ३००० रुपये...
नाशिकमध्ये लवंगी मिरची सरासरी २१५०नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणापुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार...
केळीला १२२० रुपये प्रतिक्विंटल दरजळगाव : केळी दरात गेल्या दोन दिवसात किरकोळ घसरण...
पुण्यात पालेभाज्यांची आवक स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बऱ्हाणपूरला केळीला हंगामातील सर्वाधिक दरजळगाव :  खानदेशात केळीचे दर टिकून आहेत. मध्य...
राज्यात सीताफळ १००० ते १४००० रुपये...सोलापुरात प्रतिक्विंटलला २००० ते ५००० रुपये...
नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...