सोलापुरात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांच्या ३०० वर तक्रारी

सोलापूर ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत सुमारे ३०० हून अधिक तक्रारी कृषि विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या तक्रारीत सर्वाधिक २४० तक्रारी एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत.
300 Complaints on inferior soybean seeds in Solapur
300 Complaints on inferior soybean seeds in Solapur

सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत सुमारे ३०० हून अधिक तक्रारी कृषि विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या तक्रारीत सर्वाधिक २४० तक्रारी एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत.

शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर कृषि विभागाने तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त केली आहेत. त्यानुसार शेतातील बियाण्यांची आणि शेतीची तपासणी करण्यात येत आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.

सोयाबीनच्या क्षेत्रातही १२ हजार हेक्टर वाढ झाली आहे. पण, बियाणेच उगवले नसल्याने मोठी अडचण होऊन बसली आहे. कृषी विभागानेही सावध होत, या तक्रारीवर गुन्हे दाखलाची प्रक्रिया सुरु केली आहे.

या तक्रारीत बार्शी तालुक्यातून सर्वाधिक २४०, अक्कलकोट ३०, मोहोळ ८, उत्तर सोलापूर ९, करमाळा १०, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातून ७ अशा एकूण ३०४ तक्रारी आल्या आहेत. उगवण कमी होऊनही तक्रार दिली नाही, असे शेतकरीही मोठ्या संख्येने आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com