agriculture news in Marathi 300 crore for heavy rain and flood affected farmers Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी तीनशे कोटी उपलब्ध

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात झालेल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी ठाकरे सरकारने शुक्रवारी (ता. १४) तीनशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. 

गेल्या वर्षी राज्यातील विविध भागांत २६ जुलै आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा शेतककऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यापार्श्वभूमीवर सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने नुकताच जाहीर केला आहे.  

मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात झालेल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी ठाकरे सरकारने शुक्रवारी (ता. १४) तीनशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. 

गेल्या वर्षी राज्यातील विविध भागांत २६ जुलै आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीचा शेतककऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यापार्श्वभूमीवर सांगली, कोल्हापूरसह कोकण व इतर भागातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने नुकताच जाहीर केला आहे.  

प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत बाधित शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार आहे. त्यानंतर तातडीने या कर्जमाफीसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडून कार्यक्रम खर्चाच्या योजनेंतर्गत असलेल्या निधीपैकी ३०० कोटींचा निधी कर्जमाफीसाठी वळविण्यात आला आहे. 

जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात कोकण, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अन्य शेतकऱ्यांप्रमाणे जुलै ते ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी घोषित करण्यात आली. यासंदर्भातील घोषणा तत्कालिन फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झाली होती, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.

ठाकरे सरकारने कर्जमाफीचा हा निर्णय घेतल्यानंतर यासाठीचा आवश्यक असलेला ३०० कोटींचा निधी तत्काळ वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी वस्त्रोद्योग विभागासाठी राखीव असलेल्या निधीतून तत्काळ या शेतकऱ्यांसाठी वळविण्यात आला. हा निधी वितरीत करण्याची जबाबदारी सहकार आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. याबाबतच्या खर्चाचा अहवाल संबंधित कार्यालयाने वेळोवेळी सरकारला पाठवण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री या संदर्भातील शासन निर्णय जारी झाला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
या निर्णयामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जुलै ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांच्या मदतीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची नियुक्ती करण्यात आली होती. समितीच्या निर्णयानुसार एक हेक्टर मर्यादेपर्यंतच्या पिकाच्या नुकसानीसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. पिकांना बॅंकेच्या निकषानुसार जे कर्ज दिले जाते, त्यानुसार हे कर्ज माफ करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही, त्यांना शासनाच्या नुकसान भरपाईच्या तीनपट रक्कम देण्यात येणार आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...