agriculture news in Marathi 300 ton turmeric export to Bangladesh Maharashtra | Agrowon

तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात 

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यातील दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून तीनशे टन हळद शनिवारी (ता. २६)बांगदेशला रवाना झाली.

नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यातील दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून तीनशे टन हळद शनिवारी (ता. २६)बांगदेशला रवाना झाली. 

नवा मोंढा भागात आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, प्रल्हाद इंगोले यांच्या उपस्थितीत ट्रकला हिरवी झेंडी दाखविण्यात आला. 

नांदेड तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी अलीकडच्या काळात हळद पिकविण्याकडे वळले आहेत. नांदेड आणि वसमत येथे मोठ्या प्रमाणात हळदीची आवक होते. या बाजारात काही वेळा दरात घसरण होते. अशावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी काही शेतकरी उत्पादक कंपन्या हळदीच्या निर्यातीत पुढे आल्या आहेत. यात मालेगाव (ता. अर्धापूर) येथील शेतकरी मित्र शेतकरी उत्पादक कंपनी व वसमत येथील सुर्या शेतकरी उत्पादक कंपनी या दोन कंपन्यांनी सभासद शेतकऱ्यांची प्रत्येकी दिडशे टन अशी तीनशे टन हळद निर्यात करण्याचा निर्णय घेतला. 

नाशिक येथील सह्याद्री फार्म या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हळदीची निर्यात बांगलादेशला करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (ता. २६) नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा मार्केट यार्डातून हळदीने भरलेल्या ट्रकला आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या उपस्थित हिरवी झेंडी दाखविण्यात आली. 

यावेळी बाजार समितीचे सचिव वामनराव पवार, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी श्री. शिरफुले. कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, हळद व्यापारी बद्रीनारायण मंत्री, विजयकुमार गोयंका, बालाजी भायेगावकर, शेतकरी मीत्र कपंनीचे प्रल्हाद इंगोली, सुर्या कपंनीचे प्रल्हाद बोरगड, भगवान इंगोले आदी उपस्थित होते. 


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...