राज्यात जांभळांना ३००० ते १६००० रुपये

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१०) जांभळाची चार क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ६००० ते ९००० व सरासरी ८००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला.
3000 to 16000 for Jambhul in the state
3000 to 16000 for Jambhul in the state

जळगावात क्विंटलला ६००० ते ९००० रुपये 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१०) जांभळाची चार क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ६००० ते ९००० व सरासरी ८००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड, जळगावमधील जामनेर, एरंडोल, यावल, चोपडा, भुसावळ आदी भागातून होत आहे.

आवक गेल्या १५ ते १८ दिवसांत सुरू झाली आहे. जांभळाचे उत्पादन अनेक शेतकरी बांधावरचे पीक म्हणून घेतात. काही शेतकऱ्यांनी बांधावर १० ते १५ झाडांची जोपासना करून उत्पादन घेतले आहे. आवक कमी अधिक होत आहे. पण आवक रोज होत आहे. कारण पक्व जांभूळ अधिक दिवस जांभूळ झाडावर राहिल्यास नुकसान होत आहे. पुढे काही दिवस आवक सुरू राहील. नंतर हंगाम संपेल. आवक वाढूदेखील शकते, अशी माहिती मिळाली.

परभणीत क्विंटलला ३००० ते ८००० रुपये 

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १०) जांभळांची ४ क्विंटल आवक झाली. जांभळाला प्रतिक्विंटल किमान ३००० ते कमाल ८००० रुपये, तर सरासरी ५५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून तसेच बीड जिल्ह्यातून जांभळाची आवक होत आहे. गेल्या पंधरावाड्यातील प्रत्येक गुरुवारी जांभळांची ४ ते ७ क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल ३००० ते १०००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१०) जांभळांची ४ क्विंटल आवक झाली. त्या वेळी  घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ३००० ते ८००० रुपये होते. तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ८० ते १२० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

अकोल्यात क्विंटलला ६००० ते ९००० रुपये

अकोलाः या हंगामातील जांभूळ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. अकोल्यात गुरुवारी (ता.१०) कमीत कमी ६००० ते ९००० रुपयांदरम्यान दर होता, अशी माहिती व्यापारी सूत्रांकडून मिळाली. 

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याला लागून असलेल्या भागातून जांभूळ अकोला बाजारात दाखल होतात. गुरुवारी २५ क्विंटलपेक्षा अधिक जांभूळ विक्रीसाठी आले होते. यावेळी १५ ते १७ किलोच्या क्रेटला ९०० रुपयांपर्यंत दर मिळाला. ६० ते ९० रुपयांदरम्यान प्रतिकिलोचा दर भेटला. 

उच्च दर्जाच्या मालाला अधिक मागणी होती. किरकोळ बाजारात जांभूळ १२० ते १६० रुपये किलोने ग्राहकांना विक्री केले जात होते. हंगामाला नेमकी सुरवात झाली असून पुढील आठवड्यात ही आवक आणखी वाढू शकते.

नांदेडमध्ये क्विंटलला १०००० ते १२००० रुपये

नांदेड : नांदेड बाजारात सध्या जांभळांची आवक सुरू झाली आहे. आवक सर्वसाधारण असल्यामुळे या जांभळाला १० हजार ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी मोहम्मद जावेद यांनी दिली.

नांदेड शहरात मागील अनेक दिवसांपासून स्थानिकसह चंद्रपूरहून जांभूळ नांदेड बाजारात येत आहे. सध्या दिवसाला दररोज एक ते दोन टन मालाची आवक होत आहे. या जांभळाला १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

सध्या पावसाळा असल्यामुळे पाऊस सुरू झाल्यानंतर जांभळांची आवक वाढून दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. किरकोळ बाजारात जांभूळ ८० ते १०० रुपये प्रति अडीचशेग्राम यानुसार विक्री होत आहे.

औरंगाबादमध्ये क्विंटलला सरासरी ८५०० रुपये

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत काही दिवसांपासून जांभळांची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता १०) १३ क्विंटल आवक झालेल्या जांभळांना सरासरी ८५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात तीन वेळा जांभळांची आवक झाली. ५ जूनला २४ क्विंटल आवक झालेल्या जांभळांचे दर ७ हजार ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी दर ११ हजार रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ९ जूनला जांभळांची आवक घटून ती ५ क्विंटलवर आली. त्या वेळी ५ हजार ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी १० हजार रुपये दर मिळाला.

१० जूनला जांभळांची आवक पुन्हा किंचित वाढून १३ क्विंटलवर पोहोचली. तर दर ४००० ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

पुण्यात प्रतिक्विंटलला १०००० ते १६००० रुपये

पुणे ः ‘‘गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१०) जांभळांची सुमारे १५० डाग आवक झाली होती. या मध्ये स्थानिक आवक सुमारे १००, तर गुजरात येथून ५० डागांची आवक झाली. या वेळी दहा किलोस १ हजार ते १ हजार ६०० रुपये दर होता.

गुजरात आणि कर्नाटक राज्यातून होणारी आवक अंतिम टप्प्यात आहे. सध्या स्थानिक आवक सुरु आहे,’’ अशी माहिती जांभळांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली. 

भोसले म्हणाले,‘‘ जांभळाचा हंगाम साधारण मे महिन्याच्या अखेरीस सुरु होतो. पहिली आवक ही गुजरात आणि कर्नाटक राज्यातून होते. ही आवक साधारण तीन आठवडे सुरु असते. मात्र यंदा झालेल्या तौक्ते चक्रीवादळामध्ये जांभळांचे नुकसान झाल्याने आवक कमी राहिली. सध्या पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून आवक सुरु असून, दहा किलोला १ हजार ते १ हजार ६०० रुपये दर आहे. ही आवक आणखी १५ दिवस राहील.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com