Agriculture news in Marathi 3000 to 3500 per quintal of green chillies in Aurangabad | Agrowon

औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 सप्टेंबर 2020

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १२) हिरव्या मिरचीची ५७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १२) हिरव्या मिरचीची ५७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ५९५ क्‍विंटल आवक झाली. त्याला ५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. ५५ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे दर १५०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. ५१ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १२०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. वांग्याची आवक १६ क्विंटल तर दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ७ क्विंटल आवक झालेल्या गवारला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला.

काकडीची आवक ५५ क्विंटल तर दर ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १३ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला १००० ते १५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. पत्ता कोबीची आवक ६२ क्विंटल तर दर १००० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १३ क्विंटल आवक झालेल्या लिंबूला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. ८५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ६०० ते ८०० रुपये प्रति शेकड्याचा दर मिळाला.

पालकची आवक ६५०० जुड्या तर दर ४०० ते ७०० रुपये प्रति शेकडा राहिले. १४४०० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबीरला तीनशे ते पाचशे रुपये प्रति शेकडा दर मिळाला. ७ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. पपईची आवक १९ क्विंटल झाली. या पपईला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. आवळ्याची आवक २० क्विंटल तर १००० ते २००० रुपये प्रति क्विंटल राहिले. ३३ क्विंटल आवक झालेल्या भुईमूग शेंगांना २८०० ते ३२०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.

बटाट्याची आवक ६०० क्विंटल तर दर २३०० चे २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. पेरूची आवक १६ क्विंटल तर दर ८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १३५ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबला १२०० ते ४८० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. ११ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला २२०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. मका आवक ४५ क्विंटल तर दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या कारल्याला १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला.

चवळीची आवक ८ क्विंटल तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १७ क्विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीला १४०० ते ३००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. दुधी भोपळ्याची आवक ८ क्विंटल झाली. या दुधी भोपळ्याला ९०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.


इतर बाजारभाव बातम्या
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपयेनाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये नाशिक : येथील...
नाशिकमध्ये वांग्यांना ५५०० सरासरी रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात मुगाला सरासरी ५९०० रुपये दरअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात टोमॅटो, ढोबळी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्यांच्या दरात सुधारणा,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा नगरः जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे मागील...
पुण्यात हिरवी मिरची, फ्लॉवरच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये मुगाला सरासरी ५५००, उडदाला...नगर : बाजारात मुगाची व उडदाची मोठ्या प्रमाणात आवक...
औरंगाबादमध्ये हिरवी मिरचीला सरासरी ५५००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मुंबई बाजार समितीत कांद्याच्या दरात...मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी...
परभणीत भुईमूग शेंगा सरासरी ४२५० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात डाळिंबांना ३०० ते १२००० रूपये दरनाशिकमध्ये ३०० ते १२००० रुपये नाशिक : येथील...