‘मुख्यमंत्री सौर कृषिपंपा’साठी ३०१ लाभार्थी

‘मुख्यमंत्री सौर कृषिपंपा’साठी ३०१ लाभार्थी
‘मुख्यमंत्री सौर कृषिपंपा’साठी ३०१ लाभार्थी

सोलापूर  : महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री सौर कृषिपंप’ योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या योजनेसाठी आतापर्यंत जवळपास ४३२० शेतकऱ्यांनी अर्ज केले. पहिल्या टप्प्यात १४०० प्रकरणांना मंजुरी मिळाली; पण त्यापैकी फक्त ३०१ शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष त्याचा लाभ मिळणार आहे. 

जिल्ह्यात विजेचा मोठा प्रश्‍न आहे. सततच्या भारनियमनामुळे जिल्ह्यातील भरवशाची ऊस, डाळिंब शेती धोक्‍यात आहे. अनेक भागांत ट्रान्सफार्मर, वीजजोड यांसारखे अनेक प्रश्‍न आहेत. त्यावर ही योजना चांगला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकते. पण या योजनेच्या नियम, अटी आणि निकषामध्ये बसलेल्या शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ होईल.

या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील तीन हजार ९२१, अनुसूचित जातींमधील ३८२ व अनुसूचित जमातीमधील १७, अशा चार हजार ३२० शेतकऱ्यांनी महावितरणकडे प्रस्ताव सादर केले. सर्वसाधारण प्रवर्गातील एक हजार २२२, अनुसूचित जातींमधील १७१ आणि अनुसूचित जमातीमधील सात, अशा एक हजार ४०० शेतकऱ्यांची प्रकरणे मंजूर झाली; पण प्रत्यक्षात योजनेसाठी मंजुरी मिळालेल्या शेतकऱ्यांपैकी सर्वसाधारण प्रवर्गातील २७४, अनुसूचित जातींमधील २७, अशा ३०१ शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. 

दरम्यान, शासनाने ही योजना पूर्ण करण्यासाठी एकाच ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. अनुसूचित जमातीतील एकाही शेतकऱ्याचा यामध्ये समावेश नाही. अधिकाधिक शेतकऱ्यांना सहजसोप्या पद्धतीने हे पंप मिळणे आवश्‍यक आहे. पण विविध अटी, निकषामुळे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com