agriculture news in Marathi 302 crore liter ethanol supply agreement Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कारखान्यांकडून इथेनॉलचे ३०२ कोटी  लिटर पुरवठ्याचे करार 

राजकुमार चौगुले
बुधवार, 5 मे 2021

यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल कंपन्या बरोबर ३०२ कोटी लिटरचा करार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल ७० टक्के जास्त आहे. 

कोल्हापूर : यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉल कंपन्या बरोबर ३०२ कोटी लिटरचा करार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल ७० टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी १७८ कोटी लिटर इथेनॉल तेल कंपन्यांना पुरवण्यात आले होते. यंदा करार केलेल्या इथेनॉल पैकी ११७ कोटी लिटर इथेनॉल कंपन्यांना पोच करण्यात आले आहे. 

यंदा केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांना प्रोत्साहन दिले आहे. नवीन प्रोजेक्ट उभे करण्यासाठी आर्थिक मदत ही केली आहे. इथेनॉलच्या दरात वाढ करून कारखान्यांना फायदेशीर भूमिका घेतली आहे. यामुळे ऊस उत्पादक राज्यांतील कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीला बळ दिले आहे. सुरुवातीच्या काळात साठवणक्षमता नसल्याने इथेनॉल पोहोच करणे कारखान्यांना अशक्य बनले होते. आता यात सुधारणा होत असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. 

गेल्या हंगामात इथेनॉलच्या निर्मितीमुळे ८ लाख टन साखरेचे उत्पादन कमी झाले होते. यंदा अनेक कारखान्यांनी इथेनॉलनिर्मितीला प्राधान्य दिल्याने २० लाख टनांपर्यंत साखर कमी उत्पादित होईल, असा अंदाज उद्योगातील सूत्रांचा आहे. साखरेच्या तुलनेत इथेनॉलची विक्री सुलभ असल्याने यंदा कारखान्यांना त्याचा फायदा होईल, अशी शक्यता इंडियन शुगर मिल्सच्या (इस्मा) सूत्रांनी व्यक्त केली. 

देशातील हंगाम अंतिम टप्यात आला आहे. एप्रिल महिन्याअखेर देशात २९९.१५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. ११२ कारखाने सुरू आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात अजून हंगाम सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कारखाने पावसाळा सुरू होईलपर्यंत सुरू राहतील, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रातील हंगाम आणखी पंधरा दिवसांत संपुष्टात येण्याची शक्यता, साखर कारखान्यांच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

थेट रसापासून मोठी निर्मिती 
अजून एक महिना तरी देशातील हंगाम चालेल अशी शक्यता आहे. यामुळे इथेनॉलची निर्मिती अजूनही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. यंदा ऊस रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून ७७ टक्के इथेनॉल तयार करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड, बिहार, हरियाना, पंजाब, दिल्ली आदी राज्यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण दहा टक्क्यांपर्यंत करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. देशाचे सरासरी उद्दिष्ट ७.३६ टक्क्यांपर्यंत गेले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...