agriculture news in Marathi, 305 TMC water remaining in state, Maharashtra | Agrowon

राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

पुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून राज्यात पाणी संकटाची दाहकता गडद होत आहे. यातच रविवारी (ता.२) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ३०५.४७ टीएमसी (२१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ३४ टक्के पाणी उपलब्ध होते. यंदा राज्यातील धरणे वेगाने रिकामी होऊ लागल्याने पुढील काळात टंचाईची भीषणता आणखी वाढणार आहे.

पुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून राज्यात पाणी संकटाची दाहकता गडद होत आहे. यातच रविवारी (ता.२) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ३०५.४७ टीएमसी (२१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ३४ टक्के पाणी उपलब्ध होते. यंदा राज्यातील धरणे वेगाने रिकामी होऊ लागल्याने पुढील काळात टंचाईची भीषणता आणखी वाढणार आहे.

विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात अवघे ५ टक्के आणि पूर्व विदर्भातील नागपूर विभागात १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात २५ टक्के, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक विभागात सुमारे १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात २६ टक्के आणि कोकण विभागात ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते. 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा तब्बल १३ टक्क्यांनी कमी असून, धरणांतील पाणीपातळी कमी होण्याचा वेग अधिक असल्याने पुढील काळात ‘पाणीबाणी’ वाढणार आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आहे. पाण्याची वाढती मागणी, बाष्पीभवन, गळती व इतर करणांमुळे धरणांतील पाणी कमी होणार असल्याने उर्वरीत पाण्याचे काळजीपूर्वक काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. छोटे-मोठे बंधारे कोरडेठाक पडले असून, प्रमुख प्रकल्पांचा पाणीसाठा तळाशी पोचला आहे. 

जिल्हानिहाय पाणीसाठ्याची स्थिती (स्त्रोत जलसंपदा विभाग - उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये) : राज्यातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता उर्वरीत ३४ जिल्ह्यांपैकी २७ जिल्ह्यांचा उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. तर ९ जिल्ह्यांमध्ये ३० ते ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्यातील जिल्हानिहाय पाणीसाठ्याची स्थिती पुढील प्रमाणे : उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांपेक्षा कमी असेलले जिल्हे - नगर ६.२८, अकोला २.२५, अमरावती ७.९५, औरंगाबाद ०.९९, बीड १.३९, भंडारा २.०२, बुलढाणा १.३१, चंद्रपूर १.७४, धुळे ४.५२, गडचिरोली ०.२८, गोंदिया ६.८९, हिंगोली ०.८०, जळगाव ५.०२, जालना ०.३२, लातूर ०.९६, नागपूर ५.६३, नांदेड ७.०९, नाशिक २०.२७, उस्मानाबाद १.०५, परभणी १.३९, पुणे ३८.२३, सांगली ९.६७, सोलापूर १.२४, वर्धा २.७४, यवतमाळ १७.१६,  
उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांपेक्षा अधिक असलेले जिल्हे - कोल्हापूर २९.८४, नंदुरबार ५.०९, पालघर ६.२०, रायगड ४.२४, रत्नागिरी १०.७९, सातारा ६१.६६, सिंधुदुर्ग ८.८४, ठाणे २२.६५, वाशीम ९.०६. 

पाणीपातळी अचल साठ्यात गेलेले प्रमुख प्रकल्प :
अमरावती विभाग :
खडकपूर्णा, पेनटाकळी (बुलडाणा).
औरंगाबाद विभाग : जायकवाडी (औरंगाबाद), मांजरा, माजलगाव (बीड), येलदरी, सिद्धेश्वर (हिंगोली), निम्नतेरणा, सिना कोळेगाव (उस्मानाबाद), निम्न तेरणा (परभणी).
नागपूर विभाग : गोसखुर्द (भंडारा), दिना (गडचिरोली).
नाशिक विभाग : भाम धरण, पुणेगाव (नाशिक). 
पुणे विभाग : घोड, पिंपळगाव जोगे, टेमघर (पुणे), उजनी (सोलापूर), 

अचल साठ्यात २२९ टीएमसी पाणी
सर्व प्रकल्पांचा एकूण अचल पाणीसाठा (मृत पातळी) २७५.६८ टीएमसी आहे. रविवारी (ता. २१) धरणांच्या अचल पातळीत २२९.१७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर उपयुक्त (चल पातळीत) असलेल्या ३०५.४७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. सर्व धरणांचा चल आणि अचल पाणीसाठा मिळून १७१९.७९ टीएमसी असून, यापैकी ५३६.५४ टीएमसी (३१.२) टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...