Agriculture news in marathi 31 doors of Gosikhurd project opened | Agrowon

गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने हजारांवर गावांचा संपर्क तुटला असून, अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने हजारांवर गावांचा संपर्क तुटला असून, अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी (ता.२३) सकाळी भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले. त्यातून ३३९० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे. भारतीय हवामान खात्याच्या नागपूर येथील प्रादेशिक केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सर्वाधिक ११७.६ मिमी पाऊस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोंदविण्यात आला. नागपूर ७१.७, गोंदिया ९८.४, वर्धा २५.८, यवतमाळ १९, अमरावती १९, ब्रह्मपुरी ११.६, गडचिरोली ११, वाशीम ५, अकोला ५.४ आणि बुलडाणा जिल्ह्यात पाऊस निरंक असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यात मेळघाटात ढगफुटी सदृश पाऊस पडला. 

मेळघाटात सिपना नदीला पूर 
मेळघाटात सिपना नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अनेक गावांमध्ये वृक्ष व वीजखांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला. ५० गावे संपर्क झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भंडारा जिल्ह्यातील सोनेगाव बुटी येथे संततधार पावसाने शालिक बारसागडे यांचे घर कोसळले. या घटनेत शालिक व त्यांची पत्नी शालू बारसागडे हे दोघे जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात भेदोडा येथील चंदू बिल्लावार हा शेतकरी गावाजवळील नाल्यार आलेल्या पुरात दुचाकीसह वाहून गेला. चंद्रपूर जिल्ह्यात देखील पावसामुळे नदी, नाले भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांना पावसाची झळ बसली आहे. पावसामुळे कोळसा उत्पादन देखील ठप्प झाले आहे. नागपूर परिसरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. हिंगणा येथे मुन्ना गुलाब बानिया, हा मनोरुग्ण वेणा नदीच्या मध्यभागी असलेल्या राधाकृष्ण मंदिर झोपला होता. पावसामुळे नदीला पूर आला. मंदिराच्या छतापर्यंत पाणी चढू लागले. त्याच वेळी मुन्नाला जाग आली. नदीच्या तीरावरील नागरिकांना याची कल्पना होताच त्यांनी पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने त्याला सुखरूप बाहेर काढले.

धामणा परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर अशीच स्थिती होती. सिंचन प्रकल्प देखील भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. वर्धा जिल्ह्यात देखील पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती सूत्रांनी दिली. समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने वीस गावाचा संपर्क तुटला. त्या सोबतच इतर अनेक गावांमध्ये वाहतूक देखील प्रभावी झाली. 

यवतमाळमध्ये नदी-नाले ओव्हरफ्लो 
यवतमाळ जिल्ह्यात देखील नदी-नाले ओव्हरफ्लो झाले होते. उमरखेड ते पुसद मार्गावरील दहागाव नजीक नाल्याचे पाणी पुलावरून वाहत होते. कुपटी येथील विजय दत्ता इलतकर हा युवक वाहून गेला. एका झाडाच्या सहाय्याने त्याने काही काळ आपला बचाव केला. याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासन व नागरिकांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. पावसामुळे काही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळी देखील सातत्याने वाढ नोंदवली जात आहे.

त्यामध्ये पूस, अरुणावती, बेंबळा, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, अधरपूस, अडाण, नवरगाव या प्रकल्पाचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी नोंदविण्यात आली. पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने ६८ जणांना पुरातन वाचविले. पावसामुळे प्रशासनाची पुरती पोलखोल झाली असून, संपूर्ण शहर पाण्याखाली 
आले होते. नदीपात्राच्या परिसरातच अनेक बिल्डर्सनी बांधकाम केल्यामुळे नदीचे पात्र बदलले. पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याची व्यवस्था नसल्याने पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरले. 
 

 


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...