'पीएम-किसान'साठी उद्याची डेडलाइन

यापूर्वी १८ जुलैपर्यंत पैसे जमा होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, आता किसान सन्मान योजनेसाठीदेखील आधार लिंकचा निकष नव्याने लावण्यात आला आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार यंत्रणांना निर्देशही देण्यात आले आहेत. एकूण ९२ लाख शेतकरी राज्यात योजनेसाठी पात्र ठरले असून, ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे जमा झाले आहेत. - डॉ. अनिल बोंडे, कृ षिमंत्री, महाराष्ट्र
पीएम किसान योजना
पीएम किसान योजना

नागपूर ः केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किसान सन्मान योजनेसाठी राज्यात तब्बल ९२ लाख शेतकरी खातेदार पात्र ठरले आहेत. यातील ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान योजनेच्या निधीतील प्रत्येकी दोन हजार रुपयांचे दोन टप्पे जमा करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ जुलैपर्यंत ही रक्‍कम जमा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांना हंगामात पैशाची चणचण भासते. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यांत वर्षभरात सहा हजार रुपये देण्याचे प्रस्तावित आहे. योजनेच्या लाभासाठी पूर्वी अल्पभूधारक शेतकरी अशी अट होती. त्यानंतर मात्र नोकरदार वगळता सर्वच शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सुमारे ९२ लाख शेतकरी योजनेसाठी पात्र ठरल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.  केंद्र सरकारकडून योजनेसाठी दरवेळी तीन लाख रुपये याप्रमाणे निधी दिला जातो. त्यानुसार योजनेअंतर्गत दोन टप्प्यांतील निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. ९२ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी सुमारे ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी आजवर जमा झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या बुधवार (ता. ३१) पर्यंत दोन टप्प्यांतील निधी जमा होईल, अशी माहिती देण्यात आली. यापूर्वी किसान सन्मान योजनेचा निधी जमा होण्यासाठी १८ जुलैची डेडलाइन खुद्द कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली होती.  अमरावतीत जिल्ह्यात लाभार्थी निश्‍चित करून त्यांची यादी जिल्हा संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या नेतृत्वात हे काम झाले असून, या माध्यमातून अमरावतीने योजनेच्या अंमलबजावणीत आघाडी घेतल्याची चर्चा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com