Agriculture news in Marathi 31 thousand quintals of seed available in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात ३१ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३५ हजार ९१२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. यापैकी ३१ हजार १७१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. रब्बी पेरणीला वेग आला असून, आजपर्यंत १९ हजार ४५७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. तर एक लाख २२ हजार ५०० टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख पाच हजार ५४१ टन खते मंजूर झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 

सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ३५ हजार ९१२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली होती. यापैकी ३१ हजार १७१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. रब्बी पेरणीला वेग आला असून, आजपर्यंत १९ हजार ४५७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. तर एक लाख २२ हजार ५०० टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख पाच हजार ५४१ टन खते मंजूर झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगामातील विविध पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांच्या आशा बाकी असल्याने पेरणी करण्यात शेतकरी व्यग्र झाले आहेत. या हंगाम शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाकडून तयारी केली आहे.  

प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्प्याने खते उपलब्ध होणार आहेत. यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांसाठी ३० हजार २९५ टन खतांची मागणी करण्यात आली होती. मात्र, मागणीपेक्षा जास्त म्हणजेच ४१ हजार १३ टन खते उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात रब्बीचे दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. अवकाळी पाऊस खरिपातील पिकांसाठी तोट्याचा ठरला असला, तरी मात्र रब्बी हंगामाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. 

सध्या रब्बी हंगामाला पोषक स्थिती निर्माण झाली असल्याने पेरणीच्या कामांना गती आली आहे. कृषी विभागाकडून रब्बी हंगामासाठी रब्बी पिकांसाठी ३५ हजार ९१२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. त्यामध्ये रब्बी ज्वारी दोन हजार ४२५, गहू २२ हजार ५००, हरभरा सहा हजार ५५३, मका चार हजार ४००, सूर्यफूल सहा, करडई १८ क्विंटलचा समावेश आहे. यापैकी जिल्ह्यात सध्या ३१ हजार १७१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यापैकी शेतकऱ्यांकडून १९ हजार ४५७ क्विंटल बियाणे खरेदी करण्यात आले आहे. तर ११ हजार ७१४ क्विंटल बियाणे बाजारपेठेत उपलब्ध आहे. 

माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यांत रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात सर्वाधिक पेरण्या होणार आहे. पश्चिम भागात गहू व हरभरा या पिकांच्या, तर पूर्व भागात रब्बी ज्वारी व मका पिकांना सर्वाधिक पिकांना प्राधान्य दिले जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...