agriculture news in Marathi 3.14 lac new electricity connections in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या 

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात ६६ हजार ३१०, एप्रिलमध्ये १,४४,६५१ व मेमध्ये १,०३,४४८ अशा उच्च व लघुदाबाच्या तब्बल ३ लाख १४ हजार ४०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात ६६ हजार ३१०, एप्रिलमध्ये १,४४,६५१ व मेमध्ये १,०३,४४८ अशा उच्च व लघुदाबाच्या तब्बल ३ लाख १४ हजार ४०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली. 

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे वीजमीटरचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे वीजजोडण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. नवीन वीजजोडण्यासाठी महावितरणने निविदांतर्गत पुरवठादारांना सिंगल फेजचे १८ लाख, तर थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचे कार्यादेश यापूर्वीच दिलेले आहेत. त्याप्रमाणे आतापर्यंत सिंगल व थ्रीफेजचे ९ लाख ५३ हजार नवीन वीजमीटर उपलब्ध असून ते पुणे, नागपूर, औरंगाबाद व कल्याण प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. 

यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव तीव्र स्वरूपात होता. त्यामुळे अत्यावश्यक वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचारी युद्धपातळीवर अहोरात्र कर्तव्य बजावत होते. सोबतच तातडीच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजन प्लांट, नवीन कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रांना केवळ २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यात आले. यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वैयक्तिक लक्ष घातले व वरिष्ठ पातळीवर आढावा बैठकांद्वारे या कामांना वेग दिला होता. ही कामे सुरू असतानाच कोविड-१९चे नियम पाळून दैनंदिन ग्राहकसेवा देखील सुरू ठेवण्यात आली. 

कोरोनाच्या गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत महावितरणने खडतर परिस्थितीत ग्राहकसेवेचे कर्तव्य चोखपणे 
बजावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महावितरणने सिंगल व थ्री फेजच्या १९ लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचे कार्यादेश गेल्या फेब्रुवारीमध्ये दिले होते. त्यामुळे नवीन वीजमीटरचा पुरवठा सुरळीत झाला आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे ८ लाख ६८ हजार आणि थ्री फेजचे ८५ हजार मीटर उपलब्ध झाले असून, ते प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. यामध्ये (कंसात थ्री फेज) पुणे प्रादेशिक कार्यालय- सिंगल फेज २ लाख ६९ हजार (३०,६०३), कोकण- सिंगल फेज ३ लाख २४ हजार (२५,७८७), नागपूर- १ लाख ९३ हजार (१८,३६०) आणि औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयास सिंगल फेजचे ८२ हजार व थ्री फेजचे १०,२५० नवीन वीजमीटर पाठविण्यात आलेले आहेत. 

कृषीच्या ३१ हजार जोडण्या 
उच्चदाब वर्गवारीमध्ये उद्योग १७९, वाणिज्यिक २४ , कृषी ७ आणि इतर ४० अशा एकूण २५० नवीन वीजजोडण्या केल्या. लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती २ लाख ३३ हजार ४२७, वाणिज्यिक ३८ हजार २४, औद्योगिक ६६ हजार ५०, कृषी ३१ हजार ४७५, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ३ हजार ८३ व इतर ४ हजार २०० अशा एकूण ३ लाख १४ हजार १५९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...