बस अपघातातील कर्मचारी
बस अपघातातील कर्मचारी

दापोली कृषी विद्यापीठातील 32 जणांचा बस अपघातात मृत्यू

महाबळेश्वर : महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात बस कोसळून भीषण अपघात झाला. या घाटातील दाभीक टोक जवळील 800 मीटर पेक्षा जास्त खोल दरीत ही बस कोसळली. यातील सर्व कर्मचारी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील असून यामध्ये 31 कर्मचारी आणि दोन चालक असे एकूण 33 जण बसमध्ये होते. आतापर्यंत 26 जणांनाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या अपघाता केवळ एका कर्मचाऱ्याचा जिव वाचला असून 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेनेचे स्थानीक आमदार भरत गोगावले यांनी दिली. 

सकाळी 6.30 वाजता दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते. बस दरीत कोसळ्यानंतर यातील सावंत नावाचे कर्मचारी बसमधून बाहेर फेकले गेले. त्यांनी घाटातून वर येऊन या घटनेची माहिती विद्यापीठाला कळवली. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांचे बचाव पथक, ट्रेकर्स टीम दाखल झाली आहे. महाबळेश्वरला पाऊस आणि धुके असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता. पावसामुळे खडकांवर शेवाळ तयार झाले आहे. यामुळे पाय घसरण्याची भिती असते. 

सकाळी 10 वाजताच्या दरम्यान विद्यापीठात या अपघाताविषयी फोन आला. अपघात झालेल्या बसमधील एक कर्मचारी दरीतून वर आला आणि त्याने फोन करून घटनेची माहिती दिली. दरवर्षी भात लवाणी झाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची दरवर्षी सहलीला जात असतात. यावर्षीही ही सहल निघाली होती. बसमध्ये सर्व पुरूष आहेत. आम्ही घटनास्थळाकडे निघालो आहोत. या व्यतिरिक्त आणखी माहिती आमच्या पर्यंत पोहचली नाही. - संजय भावे, वरिष्ठ कृषी अधिकारी, कोकण विद्यापीठ

बघ्यांमुळे बचावकार्यात अडथळा घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. दरीच्या चहूबाचून बघ्यांनी गर्दी केली आहे. चुकूण एखाद्याच्या पायाने काही दगड खाली सरकले तर बचाव पथाकाच्या जिवावर बेतू शकते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com